Crop Loan
Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : पीककर्जाची रक्कम शेतकऱ्यांना रोखीने मिळेना

Team Agrowon

Agriculture Loan News Jalgaon : जिल्हा बँकेतर्फे पीककर्ज (Crop Loan) वितरणाला वेग येणार आहे. सर्वाधिक पीककर्ज जिल्हा बँक (Jalgaon DCC Bank) देते. पण या बँकेचे पीककर्ज शेतकऱ्यांना बँक शाखेतून रोखीने मिळत नाही.

ते एका खासगी बँकेच्या एटीएममधून काढावे लागते. ही कटकट दूर करण्याची मागणी शेतकरी, विविध कार्यकारी सोसायट्यांचे पदाधिकारी करीत आहेत.

जिल्हा बँकेचे ग्रामीण भागात मोठे जाळे आहे. शेतकरी बँकेशी अनेक वर्षे जुळले आहेत. सर्वाधिक पीककर्जदेखील जिल्हा बँक दरवर्षी गतीने शेतकऱ्यांना देते. परंतु मागील काही वर्षे पीककर्ज बँक शाखेतून रोखीने मिळत नाही. बँकेने शेतकऱ्यांना एटीएम कार्ड दिले आहे.

जिल्हा बँकेचे आपापल्या शाखांमध्ये किंवा ग्रामीण भागात एटीएम नाहीत. हे एटीएम कार्ड एका खासगी बँकेच्या एटीएममध्ये कार्यरत करून त्यातून पीककर्जाची रक्कम काढावी लागते.

पीककर्ज एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास रक्कम काढण्यासाठी नजीकच्या शहरात दोन ते तीन वेळेस जावे लागते. यात वेळ लागतो. तसेच भाडे व इतर खर्च करावा लागतो. त्यात जोखीमदेखील आहे.

कारण एकाच वेळी पीककर्जाची मोठी रक्कम एटीएममधून काढता येत नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मजुरी व इतर देणी देण्यासाठी रोकडची गरज असते. ऑनलाइन व्यवहारांबाबत शेतकरी साक्षर नाहीत. त्याच्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

कमाल शेतकरी जिल्हा बँकेचे पीककर्ज भरताना रोकड देतात. त्यामुळे शेतकऱ्यांनादेखील रोकड मिळायला हवी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

जिल्हा बँकेला पीककर्ज एटीएमने द्यायचे आहे, पण बँकेचे आपल्या मालकीचे किंवा आपले एटीएम नाहीत. यामुळे अधिकची अडचण आहे. शेतकऱ्यांनी वारंवार याबाबत तोंडी तक्रारी केल्या, संचालकांकडे मागणी केली, पण दखल घेतली जात नाही.

संचालकांनी आवाज उठवावा

जिल्हा बँकेची या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मासिक सभा आहे. सर्व संचालक या सभेला उपस्थित राहतील. या सभेत संचालकांनी रोखीने पीककर्ज ग्रामीण भागातील शाखांमध्येच उपलब्ध करून द्यावे, असा मुद्दा उचलून त्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी खेडीखुर्द (ता. जळगाव) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष कैलास चौधरी यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT