Crop Loan : वर्ध्यात ६९ हजार शेतकऱ्यांना ९३१ कोटींचे कर्ज

खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

Wardha News : विविध बॅंकांमार्फत शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी (Rabi, Kharif Season) पीककर्ज वाटप (Distribution of crop loans) केले जाते. त्यासाठी बॅंकांना उद्दिष्टदेखील देण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कर्जवाटपाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक कर्जाचे वाटप झाले आहे.

जिल्ह्यात १५ मार्चपर्यंत ६९ हजार शेतकऱ्यांना ९३१ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले.

खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे याकरिता बँकनिहाय उद्दिष्ट निश्चित करून दिले जात असते.

शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध झाल्यास ते वेळेवर पेरणीचे नियोजन करू शकतात. जिल्ह्यात विविध राष्ट्रीय, सहकारी व खासगी बँकांच्या वतीने पीककर्ज वाटप केले जाते.

Crop Loan
Crop Loan : शेती कर्जांना ‘सिबिल’मधून वगळण्यास रिझर्व्ह बॅंकेचा नकार

संबंधित बँकांच्या शाखांना लगतच्या गावातील शेतकऱ्यांना जोडून देण्यात आले असून वेळेत पीककर्ज देण्याच्या सूचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जातात. जिल्ह्यात विविध बँकांच्या १३५ शाखांच्या वतीने कर्जवाटप केले जाते. यावर्षी बहुतांश बॅंकांनी चांगले वाटप केले आहे.

काही बॅंकांची कामगिरी उत्कृष्ट आहे. बँक ऑफ इंडिया कर्ज वाटपात आघाडीवर आहे. या बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या १५१ टक्के वाटप आतापर्यंत केले आहे. त्यात २५ हजार ५०२ शेतकऱ्यांना ३१० कोटी रुपयांच्या वाटपाचा समावेश आहे.

आतापर्यंत झालेल्या पीककर्ज वाटपामध्ये ॲक्सिस बँक २४९ शेतकऱ्यांना ५ कोटी ७७ लाख, बँक ऑफ बडोदा २ हजार ५० शेतकरी ३१ कोटींचे वाटप, बँक ऑफ महाराष्ट्र ५ हजार ७६७ शेतकऱ्यांना ८६ कोटी, कॅनरा बँक १ हजार ४५ शेतकऱ्यांना १३ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया २ हजार ५४८ शेतकऱ्यांना २९ कोटी वाटप, इंडियन बँक १ हजार ८४३ शेतकऱ्यांना २१ कोटी, एचडीएफसी बँकेकडून १ हजार ३६१ शेतकऱ्यांना ३२ कोटी, आयसीआयसीआय बँक १ हजार ७१६ शेतकऱ्यांना २३ कोटी, आयडीबीआय बँक २७३ शेतकऱ्यांना ३ कोटी ५० लाख, इंडियन ओव्हरसीज बँक ११३ शेतकऱ्यांना १ कोटी ४३ लाख, पंजाब नॅशनल बँक २ हजार ४६० शेतकऱ्यांना ४५कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया २० हजार २६१ शेतकऱ्यांना २७३ कोटी, युको बँक १६२ शेतकऱ्यांना २ कोटी, युनियन बँक १ हजार ७१४ शेतकऱ्यांना २७ कोटी तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने २ हजार ८५ शेतकऱ्यांना २८ कोटींचे कर्जवाटप केले.

Crop Loan
Farmer Suicide : उपाययोजनानंतरही वाढल्या शेतकरी आत्महत्या

यावर्षी झालेले पीककर्ज वाटप हे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. उत्कृष्ट वाटपासाठी जिल्हाधिकारी तथा बॅंकर्स कमिटीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी पीककर्ज वाटपासाठी बॅंकांचे कौतुक केले.

गेल्या काही वर्षांतील पीकवाटप स्थिती

वर्ष - पीककर्ज (कोटी रुपये)

२०१७-१८ - २७३

२०१८-१९ - ४३८

२०१९-२०- ४८९

२०२०-२१ - ७८८

२०२१-२२ - ७९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com