Paddy Procurement | Paddy MSP Agrowon
ताज्या बातम्या

Paddy MSP : शेतकऱ्यांचा भात हमीभावाने घेण्याची मागणी

तालुक्यात सरकारी हमीभाव भात खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. परंतु शेतकरी भात घेऊन गेले असता, ई-पीकपाणी नोंद झाली असेल तरच खरेदी केले जाईल असे सांगितले जाते.

टीम ॲग्रोवन

कर्जत ः तालुक्यात सरकारी हमीभाव भात खरेदी केंद्रे (Paddy MSP Center) सुरू झाली आहेत. परंतु शेतकरी भात घेऊन गेले असता, ई-पीकपाणी (E Peek Pahani) नोंद झाली असेल तरच खरेदी केले जाईल असे सांगितले जाते.

अनेक शेतकरी शिक्षित नसल्‍याने त्यांना ई-नोंदी करण्यात अडचणी येत आहेत. तर ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने काही शेतकऱ्यांना नोंद करता आलेली नाही. त्यामुळे शेतकरी नडले जात असून नाइलाजाने त्‍यांना स्वस्‍तात व्यापाऱ्यांना भात विकावा लागतो.

आधीच अवकाळी पाऊस, कोरोनामुळे शेतकरी पिचला आहे. त्‍यांच्या अडचणींची दखल घेत भाजप किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन सरसकट भात आधारकार्ड आणि सातबारा घेऊन हमी भावाने खरेदी करावे, अशी मागणी केली आहे.

तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत भात खरेदीसाठी सूचना केल्‍या आहेत. जिल्‍ह्‌यात आतापर्यंत ३८ ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शक्‍यतेने शेतकऱ्यांची भात विक्रीसाठी लगबग सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT