Gokul Milk Kolhapur Agrowon
ताज्या बातम्या

Gokul Milk : अमूल, चितळेंना जमलं पण गोकुळला का नाही? चिठ्ठीवरचा कारभार कधी बंद होणार

Kolhapur Jilha Dudh sangh : गोकुळकढून दूध उत्पादकांना मात्र जुन्याच पद्धतीने चिठ्ठया देऊन कारभार केला जातो. यामुळे दूध उत्पादकांना याचा मोठा फटका बसतो.

sandeep Shirguppe

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध (गोकुळ) कडून मागच्या ६० वर्षांत अनेक बदल केल्याने दुधाच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. परंतु गोकुळकढून दूध उत्पादकांना मात्र जुन्याच पद्धतीने चिठ्ठया देऊन व्यवहार होत असल्याने याचा दूध उत्पादकांना याचा मोठा फटका बसत माहिती समोर आली आहे.

मागच्या कित्येक वर्षांत गोकुळकडून अनेक बदल करण्यात आले परंतु दुधाची माहिती मात्र वर्षानुवर्षे चिठ्ठीद्वारे दिली जाते. गोकुळकडून सध्या सॅटेलाईट डेअरी, कोअर नेटवर्क, सिक्स लेयर पॅकिंग असे अनेक प्रयोग राबवले जातात.

गोकुळ यामध्ये चांगली प्रगती केली परंतु दूध बिलाची प्रक्रिया अद्यापही चिठ्ठी पद्धतीने ठेवली आहे. काही दिवसांनी चिठ्ठीवरील आकडे गायब झाल्यानंतर उत्पादकांना बिल घेताना गोंधळाची स्थिती निर्माण होते.

गोकुळने अनेक गोष्टीत बदल केले परंतु नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून मोबाईल अॅप व मेसेज सुविधा अद्यापही सुरू केली नाही. जर अशी सुवीधा दूध उत्पादकांना दिल्यास याचे चांगल्या पद्धतीने स्वागत होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या स्पर्धक दूध संघांनी अशा गोष्टींचा वापर केल्याने अनेक गोष्टी त्यांना सोप्या जात आहेत.

राज्यात सर्वाधीत दूध संकलन करणारा दूध संघ म्हणून गोकुळचे नाव आहे. दूधाच्या उत्पादनात घट झाली असली तरीही सध्या १४ लाख लिटर दुधाचे संकलन गोकुळकडून होत आहे. मात्र, एवढा मोठा दूध संघ असूनही, दूध उत्पादकांना दररोजच्या दुधाची माहिती चिठ्ठीद्वारे दिली जात असल्याची खंत व्यक्त होत आहे.

दूध संस्थांकडून देण्यात येणाऱ्या दूध उत्पादकांसाठीच्या चिठ्ठीवर एकूण घातलेले दूध, फॅट, दर, रक्कम, एस. एन. एफ. आदी माहिती दिलेली असते. परंतु ही चिट्टी गहाळ होते किंवा त्यावरील माहिती पुसली जाते. यातून दूध उत्पादक आणि डेअरी वाल्यांमध्ये गैरसमज होत असतात. याला सोपा पर्याय काढण्यासाठी आता उत्पादकांकडून अॅप काढण्याची मागणी होत आहे.

याबाबत दैनिक सकाळला अक्षय पवार या दूध उत्पादकाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दूध उत्पादक आमच्या गोठ्यातून गोकुळ, अमुल तसेच खाजगी दुग्ध प्रक्रिया व्यवसायिकांना दुधाचा पुरवठा होत असतो.

मात्र गोकुळ व्यतिरिक्त इतर ठिकाणी दुधाच्या हिशोबासाठी ॲपचा वापर होतो. दररोजच्या दुधाची विस्तृत माहिती असल्याने निर्णय घेणे सोपे होते. 'गोकुळ'नेही हीच पद्धत अवलंबणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT