Soybean Cotton
Soybean Cotton Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Cotton : पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतातूर

टीम ॲग्रोवन

दानापूर, जि. अकोला ः तेल्हारा तालुक्यात दानापूर परिसरात गेल्या दोन दिवसाअगोदर मध्यरात्री पुन्हा जोरदार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावल्यामुळे शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन (Soybean Harvest) तसेच वेचणीस आलेला बागायती कापूस (Cotton Picking) भिजला असून, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेते काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

या भागात गेले काही दिवस पावसाने उघड दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणीला सुरुवात केली होती. मात्र गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने दानापूर, सोगोडा, बोरखेड, हिंगणी, सौंदळा, वारखेड, रायखेड, कोठा, बेलखेड आदी भागांत सोंगून ठेवलेले सोयाबीन ओले झाले. तसेच काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचा ढीग ताडपत्रीने शेतातच झाकून ठेवला होता.

सतत तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटाला शेतकरी कंटाळला असून, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. दानापूर परिसरात या वर्षी ओल्या दुष्काळामुळे सोयाबीन पीक फुलधारणा अवस्थेत असताना बुरशीजन्य रोगामुळे संकटात सापडले होते. फूलगळ झाल्याने सोयाबीनचे एकरी उत्पादन दीड ते दोन क्विंटलवर आले. तसेच कपाशीची बोंड काळसर झाल्यामुळे उत्पादनात हमखास घट दिसत आहे.

ओला झालेला कापूस पिवळसर होत आहे. यामुळे दरांवर परिणाम होऊ शकतो. आणखी काही दिवस पाऊस राहिल्यास शेतकऱ्यांचे शेतात राहिलेले सोयाबीन, कापूस मातीत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

अचानक आलेला वारा, पावसामुळे तीन एकरांतील वेचणीस आलेला कापूस ओला झाला. काही ठिकाणी बोंडे मातीत मिसळली. अतिपावसामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झालेली आहे.
विनोद लाव्होडे, शेतकरी, दानापूर
दोन एकरांतील सोयाबीनचा सोंगून ठेवलेला ढीग शेतात होता. अचानक गुरुवारी रात्री जोराचा पाऊस आल्यामुळे या ढिगात पाणी मुरले. अधिक पाऊस येण्याचा अंदाज असल्यामुळे ताडपत्री टाकून सोयाबीनचा ढीग झाकून ठेवला. सोयाबीन काळे पडण्याची भीती आहे.
विलास खवले, शेतकरी, दानापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : शिर्डीतल्या तिरंगी लढतीकडे लागले राज्याचे लक्ष

Unauthorized Seed Stock : एक लाख रुपयांचा अनधिकृत बियाणे साठा जप्त

Pre Monsoon Rain : वादळी वाऱ्यासह पावसामुळे दाणादाण

Millet Crop : भरडधान्याची पिके वाढून विकास होईल; नांदेड येथे मराठवाड्यातील भरडधान्य पिक परिषदेत तज्ज्ञांचा आशावाद

Fodder Production : चारा पिकांच्या क्षेत्रात तीन हजार हेक्टरने वाढ

SCROLL FOR NEXT