Leopard terror  Agrowon
ताज्या बातम्या

Leopard Terror : चार बिबट्यांच्या वावराने शेतकरी भयभीत

Team Agrowon

Pune News : येथील बेट भागात चार बिबट्यांच्या वावराने शेतकरी भयभीत झाले आहेत. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे एकाच वेळी चार बिबटे रात्रीच्या वेळी मुक्तसंचार करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या वर्षभरात तालुक्याच्या बेट भागात बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मेंढपाळ व शेतकऱ्यांना पशुधन गमवावे लागले. बिबट्यांनी मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळवला आहे.

सध्या शिरूर तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी, पिंपरखेड, सविंदणे, कवठे येमाई, चांडोह, जांबुत, फाकटे, म्हसे परीसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असल्याने बिबट्यांची दहशत कायम आहे.

शेतकऱ्यांना शेती काम करताना दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत आहे. वन विभागाने तत्काळ पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

मागणीची दखल न घेतल्यास वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल. वेळेप्रसंगी अधिका-यांना तालुक्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा शिरूर-आंबेगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे यांनी दिला.

व्हायरल व्हिडिओबाबत वन विभागाचे स्पष्टीकरण

पिंपरखेड परिसरातील ४ बिबट्यांचा व्हायरल व्हिडिओ सत्य असून, नर मादी व दोन बछडे आहेत. याप्रकारे तालुक्यात इतर ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. पिंपरखेड, पाबळ, वडनेर, कवठे येमाई इत्यादी भागात रात्र गस्त वाढविली आहे.

पिंजरे लावणे, रात्री गस्त घालणे, जनजागृती करणे यांसह आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT