Water Shortage Agrowon
ताज्या बातम्या

Water Fodder Shortage : चारा-पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची शेतकऱ्यांची तयारी

Fodder Shortage : सांगली जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यामुळे चार वर्षांत दुष्काळी पट्ट्यात पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई भासली नाही.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी आणि चाराटंचाई निर्माण झाल्याने शेतकरी अस्वस्थ आहे. दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त होत असून आता रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नसल्याची चर्चा सुरू आहे.

सांगली जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यामुळे चार वर्षांत दुष्काळी पट्ट्यात पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई भासली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागला नाही. यावर्षी उन्हाळ्यातील पावसाने पाठ फिरवली. परिणामी चारा पिकांची पेरणी करणे शक्य झाले नाही.

आटपाडी, कवठे महांकाळ, जत, तासगाव आणि खानापूर तालुक्यात गेल्या महिन्यापासून पाणी आणि चाराटंचाई भासू लागली आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिकांची पेरणी झाली नाही. त्यातच लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला आहे.

एका बाजूला जिल्हा प्रशासनाने गेल्या महिनाभरात संभाव्य पूर परिस्थितीबाबत अनेक बैठका घेतल्या. पूरग्रस्त गावांमध्ये विविध प्रकारच्या खबरदारी घेण्याबाबत उपाययोजनाही केल्या. दुष्काळी भागातील शेतकरी चारा आणि पाणीटंचाई दूर करण्यासाठी मागणी करत आहेत. परंतु दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून याबाबत प्रशासनाने एकही बैठक घेतली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

Fisheries Crisis : तलाव आटल्याने मत्स्य संस्थांवर आर्थिक संकट

SCROLL FOR NEXT