Rabi Season Agrowon
ताज्या बातम्या

Cloudy Weather : ढगाळ वातावरणाची शेतकऱ्यांना धास्ती

अतिवृष्टीच्या तडाख्यात प्रचंड नुकसान सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर खरीप हंगामात आली. त्यामुळे शेतीकाम प्रभावित झाल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

नाशिक ः अतिवृष्टीच्या (Heavy Rain) तडाख्यात प्रचंड नुकसान सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर खरीप हंगामात (Rabi Season) आली. त्यामुळे शेतीकाम प्रभावित झाल्याची स्थिती आहे. आता अगाप हंगामातील द्राक्ष (Grapes Harvesting) काढणी सुरू आहे. याशिवाय खरीप कांदा (Onion) काढणीस आलेला आहे, तर काही शेतकरी (Farmer) मका, भात मळणी करत आहेत; अशात जिल्ह्यात रविवारी (ता. ४) दुपारपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी धास्ती वाढली आहे.

हिवाळा सुरू असला तरी जिल्ह्यात २ दिवसांपासून थंडी कमी झाल्याची स्थिती आहे. अशातच रविवारी (ता. ४) दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले. तर काही भागात पूर्णपणे धुके आणि ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर नाशिक शहरात सर्वत्र ढग दाटून आले होते. गंगापूर रोड, सातपूर, त्र्यंबकेश्वर रस्ता, त्रिमूर्ती चौक, नांदूर नाका, पंचवटी, मुंबई आग्रा हायवे, नाशिक रोड या परिसरात हलका शिडकावा तर काही ठिकाणी सरी पडल्या. त्यामुळे शेती शिवारातील मका, सोयाबीन हा ठेवलेला माल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. सध्या लगीनसराई सुरू आहे. त्यातच पाऊस होतो की काय? याची धास्ती अनेकांनी घेतली होती.

जिल्ह्यात कसमादे भागात सटाणा, मालेगाव तालुक्यांत द्राक्ष काढणी कामे सुरू आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सध्या देवळा, चांदवड व मालेगाव तालुक्यांत लाल कांदा काढणीची कामे जोरात सुरू आहेत. तर अनेक भागांत उन्हाळ कांद्याची लागवड सुरू आहे. त्यामुळे ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. यापूर्वी अतिवृष्टीच्या तडाख्यात खरीप, लेट खरीप व उन्हाळ कांदा रोपाचे बुरशीजन्य रोगामळे नुकसान झाले आहे. आता उन्हाळ कांदा लागवड होत असताना पावसाचे वातावरण झाल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली.

लागवड झालेल्या लेट खरीप कांद्यावर मावा पडत आहे. गोदाकाठ भागात गेल्या चार दिवसांपासून सकाळी धुके येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे उन्हाळ कांदा रोपांवर त्याचा परिणाम होऊन रोपे पिवळी पडत आहेत. तर जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात आदिवासी भागात भात सडकणी सुरू आहे; मात्र ढगाळ वातावरणाची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. मालेगाव तालुक्यात डाळिंब काढणी सुरू आहे. बागेतील फुलगळ, तेलकट डाग रोग, तसेच तयार माल फुटणे अशा समस्या वाढत्या आहेत.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची वाढली चिंता

काही भागात पाऊस नाही; परंतु ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. तर काही भागात द्राक्ष बागांवर डाऊनी, भुरी, मिलीबगचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संभाव्य प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. बागांमध्ये फवारण्या सुरू असून शेतकऱ्यांचा पीक संरक्षण खर्च वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT