ताज्या बातम्या

Tomato Rate : ९०० किलो टोमॅटोला मिळाले फक्त ३४ रुपये, ट्रॅक्टर घेण्याच्या स्वप्नाचा चुराडा

Tomato Farmer : मागच्या ४ महिन्यात भाव खाणाऱ्या टोमॅटोला कवडीमोल दर आल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे.

sandeep Shirguppe

Tomato Rate News : मागच्या ४ महिन्यात भाव खाणाऱ्या टोमॅटोला कवडीमोल दर आल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्याच्या चिंचोली येथील नामदेव सरवळे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील ९०० किलो टोमॅटो कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता. यावेळी हमाली, तोलाई व वाहतुक खर्च वजा करता केवळ ३४ रूपये सरवळे यांच्या हातात आल्याने निराश होऊन ते परत गेले.

मागच्या कित्येक वर्षांत टोमॅटोला चांगला दर मिळाला असल्याने शेतकरी आनंदात होता. परंतु सरकारच्या आडमुठ्या धोरणांमुळे १५० रुपये भाव घेणाऱ्या टोमॅटोला दीड रुपयांवर आणलं आहे. टोमॅटोला चांगला दर असल्याने राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादन घेतले. परंतु केंद्र सरकारने शहरी मतदार सांभाळण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या पोटावर पाय देत नेपाळ व इतर देशातून टोमॅटो आयात केला.

मात्र, या महिन्याच्या सुरूवातीपासून टोमॅटो दरात मोठी घसरण झाली असून, यामुळे शेतात केलेला खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. सोलापूर, मोडनिंब, कोल्हापूर बाजारपेठेत दोन ते तीन रूपये प्रतिकिलो इतका दर मिळत आहे. केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

खते, औषधे यांच्या किमतीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. मोठ्या अपेक्षेने चांगला दर मिळेल, या आशेने टोमॅटो लागवडी केली. मात्र, दरात घसरण झाल्याने उत्पादन खर्च निघणेही मुश्किल झाले आहे. शेतमाल बांधावर टाकून देण्याची वेळ आली आहे.

टोमॅटो उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल या आशेने मोठा खर्च केला. मात्र, दरातील घसरणीने सारे नियोजन कोलमडले आहे. नवीन ट्रॅक्टर खरेदीचेही नियोजन होते. मात्र, टोमॅटोतून केलेला खर्चही निघालेला नाही. वाहन खरेदी करण्याचा मी थांबवला आहे, असे नामदेव सरवळे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Budget for Farmer 2026 : शेतकऱ्यांसाठी 'भारत-विस्तार एआय टूल', अर्थमंत्र्यांची घोषणा; नारळ, काजू आणि चंदन उत्पादकांसाठी घोषणा

Textile Industry: कापूस उद्योगासाठी मोठी घोषणा; वस्त्रोद्योगासाठी सर्वसमावेशक ५ कलमी कार्यक्रम जाहीर

Cultural Economy: निसर्गप्रधान जीवनशैली व सांस्कृतिक-अर्थकारण

National Waterways: पुढील पाच वर्षात २० राष्ट्रीय जलमार्ग सुरु करणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

Grass lands: गवताळ राने जपणे गरजेचे

SCROLL FOR NEXT