Sugarcane Farmer Kolhapur : कोल्हापुरच्या शेतकऱ्याचा नादखुळा, उसात पाच आंतरपिके घेत ठेवला नवा आदर्श

sandeep Shirguppe

कागल तालुक्यातील करणूर गावचे शेतकरी

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याच्या करनूर गावातील सतीश सांगावकर यांनी ऊस आणि त्यात सुमारे पाच आंतरपिके घेत वेगळाच पॅटर्न दहा वर्षांपासून कायम ठेवला आहे.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

ऊसाचे गाव करणूर

कोल्हापूर- बंगळूर महामार्गानजीक कोगनोळी टोल नाक्‍याजवळ करनूर (ता. कागल, जि. कोल्हापूर) हे गाव आहे. प्रामुख्याने ते ऊस शेतीसाठी प्रसिद्घ आहे.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

सतीश सांगावकर प्रगतशील शेतकरी

सतीश सांगावकर यांनी आपल्या नऊ एकर शेतीत सुमारे सहा एकर क्षेत्रावर उस पीक घेतता. यात तीन एकर लागवडीचा ऊस तर तीन एकरांत त्याचा खोडवा असतो.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

आंतरपिकातून केली क्रांती

सतीश हे जूनच्या मध्यावधीनंतर ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात भुईमूग, मिरची आदींची लागवड बोदावर करतात. ऑगस्टमध्ये उसाची लागवड करतात. तोपर्यंत आंतरपिकांची वाढ सुरू झालेली असते.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

अनेक पाले भाज्यांचे उत्पादन

मिरचीच्या मधल्या तीन फूट जागेत कमी कालावधीतील पालेभाज्या उदा. पालक, कोथिंबीर व जोडीला काही प्रमाणात झेंडू अशी जवळपास ४ ते ५ आंतरपिके घेतात.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

खतांची मात्रा प्रमाणात

आंतरपिकांच्या लागवडीपूर्वी मिरची व भुईमुगासाठी सिंगल सुपर फॉस्फेट, १०. २६. २६. तर ऊस लागवडीवेळी डीएपी, पोटॅश, युरिया आदींचा प्रत्येकी एकरी सत्तर किलो प्रमाणात ते वापरतात.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

मजूर टंचाईवर मात

पूर्वी सतीश वेलवर्गीय पिके घ्यायचे. मात्र त्यात मजूरसंख्या जास्त लागायची. त्या तुलनेत कमी मजूरबळ असलेल्या काही पिकांची निवड त्यांनी केली.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

उन्हाळी सोयाबीनचा यशस्वी प्रयोग

उसाच्या खोडव्यातही उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग सतीश दहा वर्षांपासून करीत आहेत. ऊस तुटल्यानंतर पाचट बारीक करून ते एकसारखे पसरविले जाते.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

भरघोस उत्पादन

दरवर्षी या सोयाबीनचे सहा ते सात क्विंटल उत्पादन घेण्यात यशस्वी झाल्याचे सतीश सांगतात. खरिपातही जागेच्या उपलब्धतेनुसार उसात आंतरपीक म्हणून बोदावर सोयाबीन घेतल्याची माहिती सतीश यांनी दिली.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon

पत्नीचीही साथ

सतीश ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक आहेत. त्यातील सर्व माहिती-ज्ञानाचा वापर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याचबरोबर त्यांच्या पत्नीचाही मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितलं.

Sugarcane Farmer Kolhapur | agrowon
kas pathar | Agrowon