Tomato Rate Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Rate : टोमॅटोच्या दरात घसरण

राज्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकांचे नुकसान झाले होते.

Team Agrowon

वाशीः राज्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर टोमॅटो (Tomato Rate) पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे एपीएमसीत टोमॅटो ४० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ५० ते ५५ रुपये किलोपर्यंत दरवाढ झाली होती. मात्र, दिवाळीनंतर हे दर किलोमागे २५ रुपयांनी घसरले असून किरकोळ बाजारात ३० रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत आहे.

अतिवृष्टीमुळे टोमॅटो नाशिक, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी टोमॅटोची केलेली लागवड पाण्याखाली गेली होती. हाती आलेले पीक डोळ्यांदेखत सडू लागले होते. यामुळे मुंबई एपीएमसीला होणारी टोमॅटोची आवक कमी झाली होती. त्यामुळे टोमॅटोचे दर वाढले होते.

एपीएमसीच्या घाऊक बाजारात नेहमी ७० ते ८० गाड्या टोमॅटोची आवक होत होती. ती आवक ३० ते ३५ गाड्यांवर आली होती. यामुळे एपीएमसी घाऊक बाजारात ३५ ते ४० रुपये, तर किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा टोमॅटोला ६० ते ६५ आणि दुय्यम प्रतीचा टोमॅटो ५० ते ५५ रुपये ग्राहकांना मोजावे लागत होते.

आवक वाढली...

दिवाळी होताच टोमॅटोची आवक वाढली असून बाजारातील दरही निम्म्यावर आले. एपीएमसीत १८ ते २२, तर किरकोळात ३० रुपये किलोने टोमॅटोची विक्री केली जात आहे. आवक वाढल्यानंतर टोमॅटोचे दर आणखी खाली येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

SCROLL FOR NEXT