Grampanvhayat Agrowon
ताज्या बातम्या

Rural Development : ग्रामपंचायत सक्षमीकरणामुळे गावांचा सर्वांगीण विकास

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केलेले अभियान महत्त्वपूर्ण आहे.

टीम ॲग्रोवन

सोलापूर : ‘‘जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत (Grampanchayat) विभागाने ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केलेले अभियान महत्त्वपूर्ण आहे. यामुळे गावांचा सर्वांगीण विकास (Rural Development) होईल,’’ असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी सांगितले.

जिल्ह्यात ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानाचा प्रारंभ आणि अभियान माहिती पुस्तकाचे अनावरणप्रसंगी पालकमंत्री श्री. विखे-पाटील बोलते होते. या वेळी आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील,

सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे आदी उपस्थित होते.

श्री. विखे-पाटील म्हणाले, ‘‘सीईओ दिलीप स्वामी यांची संकल्पना आदर्शवत असून यामध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे. दोन ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत अभियान सुरू राहणार आहे.

ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा, ग्रामपंचायतीच्या योजना लोकाभिमुख करणे, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविणे, ग्रामसेवकांना प्रशिक्षण देणे, ग्रामस्थांना संगणकीकृत सेवा पुरविणे आदी उद्दिष्ट्ये अभियानाची आहेत,’’ असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Notification : शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना, उद्यापासून नुकसानीचे पंचनामे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट

Oat Fodder Crop: रब्बी हंगामात ओट पौष्टिक चाऱ्याचा चांगला पर्याय; अडिच महिन्यात पहिली कापणी!

Sugarcane Guarantee Price: हमीभाव मिळेपर्यंत कोयता लावू देणार नाही: रयत क्रांती शेतकरी संघटना

Spray Drying Technology: ‘स्प्रे ड्रायिंग’द्वारे पावडर निर्मिती तंत्र

Agriculture Visit: केंद्रीय कृषी सचिव चंद्रा यांच्यासह अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT