Gunthewari  Agrowon
ताज्या बातम्या

Gunthewari Proposal : ग्रामीण गुंठेवारी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम २०२१ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचे अनधिकृत भूखंड, अनधिकृत भूखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यास मान्यता दिली.

Team Agrowon

Nanded News नांदेड : गुंठेवारीचे (Gunthewari) बरेच प्रस्ताव दाखल करावयाचे शिल्लक आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास आता ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम २०२१ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचे अनधिकृत भूखंड, अनधिकृत भूखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यास मान्यता दिली.

त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भूखंड, अनधिकृत भूखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यासाठी नगररचना विभाग (शाखा कार्यालय नांदेड) यांच्याकडे नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट, इंजिनिअर यांच्यामार्फत छाननी शुल्कासह प्रस्ताव दाखल करण्यास ३१ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

त्यास आता ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्राधिकृत अधिकाऱ्‍यांनी (गुंठेवारी कक्ष) कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हिरव्या मिरचीचे दर टिकून; ज्वारीला मागणी कायम, पेरुचा बाजार स्थिर, कारली दर टिकून तर हळदीचे दर स्थिर

Monsoon Rain: मराठवाड्यात २ दिवस पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, कोकणातही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

Sangli Rainfall: सांगली जिल्ह्यात पावसाची टक्केवारी घटली

Transformer Issues: बागायती पिकांत सिंचनास वेग, अनेक रोहित्र नादुरुस्त

Crop Insurance: जळगावात कापूस पीकविमा परतावा प्रलंबित

SCROLL FOR NEXT