Kolhapur News: देशातून २०२४-२५ मध्ये इथेनॉल तयार करण्यासाठी १२५ लाख टन मक्याचा वापर करण्यात आला आहे. गेल्या इथेनॉल आर्थिक वर्षात मक्यावर आधारित इथेनॉलचा ४७७ कोटी लिटरचा पुरवठा तेल कंपन्यांना करण्यात आला असून, इथेनॉल निर्मितीसाठी मका हा सर्वाधिक कच्चा माल म्हणून पुढे येत आहे. २०२४-२५ मध्ये मक्याचे देशातील उत्पादन ४३४ लाख टन इतके झाले. इथेनॉलसह कुक्कुटपालन व पशुखाद्यासाठी मक्याचा वापर केला जात आहे..इथेनॉल निर्मितीसाठी मक्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तांदळाचा कोंडा, तुकडा तांदूळ, बाजरी आणि गव्हाचा कोंडा यासारख्या देशांतर्गत उपलब्ध पर्यायी घटकांचाही वापर करत असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असला, तरी मक्याची टंचाई देशात कुठेही नसल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. कच्च्या मालाचा आधार अधिक वैविध्यपूर्ण करण्यासाठी सरकार गोड ज्वारीसारख्या पर्यायी पिकांच्या व्यवहार्यतेचाही अभ्यास करत असले तरी अद्याप म्हणाव्या त्या प्रमाणात या ज्वारीची लागवड होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे..Ethanol Production: मक्यापासून इथेनॉल निर्मिती करा.मका उत्पादन वाढीसाठी प्रयत्नमका उत्पादन वाढावे यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानअंतर्गत सुधारित व संकरित बियाणे, खत व्यवस्थापन, कीडनियंत्रण व यांत्रिकीकरणासाठी अनुदान दिले जात आहे. कोरडवाहू व मध्यम पर्जन्यमान असलेल्या भागात मका लागवडीस विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. आयसीएआर व कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे, दुष्काळसहिष्णू वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहेत. कृषी विज्ञान केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना लागवड, खत-पाणी नियोजन व काढणीपश्चात प्रक्रियेबाबत प्रशिक्षणही दिले जात आहे..दर घसरणीने अस्वस्थतामका उत्पादन वाढीसाठी केंद्राने प्रयत्न सुरू ठेवले असले तरी दराबाबत मात्र गेल्या काही महिन्यांपासून मका उत्पादकांत मोठा रोष आहे. औद्योगिक वापरासाठी मक्याचा वापर वाढत आहे. दुसरीकडे मक्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे विरोधाभास दाखविणारे विदारक चित्र आहे. एकीकडे केंद्राकडून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू असतानाच प्रत्यक्ष उत्पादकाच्या हातात मात्र अत्यंत कमी रक्कम येत असल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. या दर घसरणीच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत..Ethanol Production: इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ४५ हजार कोटींचे अतिरिक्त उत्पन्न : नितीन गडकरी .मक्यापासून इथेनॉल निर्मिती सुलभमक्यापासून इथेनॉल तयार करण्याची प्रक्रिया तुलनेने स्वस्त तांत्रिकदृष्ट्या सुलभ असते. साखर कारखान्यांप्रमाणे जटिल प्रक्रिया लागत नाही. मका कोरड्या स्वरूपात दीर्घकाळ साठवता येतो. वाहतूक करताना नुकसान तसेच लॉजिस्टिक अडचणी कमी असल्याने पसंती दिली जात आहे..प्रमुख उत्पादक राज्येकर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, तेलंगणा, उत्तर प्रदेश.मका वापराचे प्रमुख क्षेत्र५० ते ५५ टक्केकुक्कुटपालन व पशुखाद्य१० ते १५ टक्केअन्न व औद्योगिक प्रक्रिया३० ते ३५ टक्केइथेनॉल उत्पादन.इथेनॉलसाठी मक्याची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत आहे. उत्पादन वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. - निमुबेन जयंतीभाई बंभाणिया, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.