लातूर जिल्ह्यातील शिवणखेड (ता. अहमदपूर) गावाचा कारभार ग्रामस्थांनी महिलांच्या हाती दिला आहे. महिलांनी कारभारात पारदर्शकता ठेवली. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला. सामाजिक सलोख्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. जात, धर्म बाजूला ठेवून ग्रामस्थ एकमेकांच्या सुखदु:खात कायम एकत्र आहेत. खरोखरच स्मार्ट म्हणावे, अशीच या गावाची ओळख रूढ होत आहे. गावात दर्जेदार नागरी सुविधांसह शेतकऱ्यांना केळी लागवडीसाठी ‘मनरेगा’तून मदत देण्यात येत आहे. विविध उपक्रमांतून गावाची आत्मविश्वासाने वाटचाल सुरू आहे..लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद ते उदगीर रस्त्यावरील शिवणखेड गावाचा कायापालट होण्यास सुरुवात झाली ती तिरू नदीवरील मध्यम प्रकल्पामुळे. गावाजवळच १९७२ मध्ये हा प्रकल्प झाला आणि सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या. यामुळे गाव सधन झाले. सिंचनातून शेती उत्पन्न वाढले. त्यानंतर गावात गटतटाचे राजकारण वाढले. दुसरीकडे शिक्षणाचे प्रमाण वाढले. शिक्षणामुळे भांडणतंटे कमी होत गेले. गटतट निघून गेले. गाव पुन्हा एकोप्याने राहू लागले. गावातील सर्व जाती, धर्मांचे उत्सव, सण लोक एकत्र येऊन करू लागले. सामाजिक सलोखा हाच गावाचे प्रमुख वैशिष्टय आहे..Smart Village Project : राज्यात ७५ स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज होणार; पाच जिल्ह्यातील गावांचा समावेश, शासन निर्णय जारी.स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व अन्य क्षेत्रांत मोठी प्रगती झाली आहे. सामाजिक सलोखा जपत गावात सर्व धर्म, जातींचे ग्रामस्थ एकोप्याने नांदतात. अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण झाले असून शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह शैक्षणिक व पोषणविषयक उपक्रमांचे व्हिडिओ पालकांना नियमितपणे पाठवले जातात. शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे. शिवारात आधुनिक शेती आणि बागायती पिकांच्या उत्पादनात वाढले आहे. गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कारभारात पारदर्शकता आणि लोकसहभाग, अशीच या गावविकासाची त्रिसूत्री आहे..पाणीपट्टी, घरपट्टीतून आत्मनिर्भरपूर्वी गावात तेवढ्या नागरी सुविधा काहीच नव्हत्या. दोन वर्षांपासून विविध योजनांतून सुविधा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. ग्रामपंचायतीकडे स्वतःचा निधीही नव्हता. कराच्या वसुलीतून तो उपलब्ध होणार होता. यामुळे कर वसुलीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत कराच्या थकबाकीवर पन्नास टक्के सवलत देण्यात आली. सरपंच रुक्साना शेख यांनी विविध उपक्रमातून परिणामकारक कराची वसुली झाली. ग्रामपंचायतींकडे गावातील विकासकामांला निधी उपलब्ध झाला. .Smart Village : कुंभारी झाले सुंदर, पर्यावरणपूरक हरितग्राम.आपले सरकार सेवा केंद्रात नाममात्र शुल्कात सेवा दिली जाते.ग्रामपंचायतीमार्फत गावातील सर्व मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडले आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सौर ऊर्जेवरील पथदिवे, शोषखड्डे, लागवड केलेल्या वृक्षांना ठिबकद्वारे पाणी, सार्वजनिक कचराकुंडी, चकाचक रस्ते आदी सुविधा उपलब्ध झाल्याचे ग्रामपंचायत अधिकारी महेश देवर्षे यांनी सांगितले..लोकसहभागातून गावविकासग्रामपंचायत बारा सदस्यांची असून ग्रामस्थांनी गावाचा कारभार महिलांच्या हाती सोपविला आहे. २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत बारापैकी नऊ महिला सदस्या निवडून आल्या. त्यानंतर सरपंचपदी रुक्सानाबी शेख आणि उपसरपंच शोभा भंडारे यांची निवड झाली. सदस्यांत आयेशा शेख, उषाबाई गादगे, करिष्मा सुरवसे, शिवकांता शिंदे, सावित्री ताडमाडगे, लक्ष्मीबाई वाघमारे, ज्योती सोनकांबळे, कृष्णा मुसने, परमेश्वर तिरकमटे आणि मारोती कांबळे यांचा समावेश आहे. गावच्या विकासात लोकांचा सहभाग मोठा आहे. लोकवाट्यातूनच मोठ्या संख्येने कामे झाली. वृक्ष लागवड करण्यात आली. लोकांनी ग्रामविकासाला सढळ हाताने मदत केली आहे. आता अन्य विकास कामांसाठीही हीच परंपरा सुरू असल्याचे सरपंच शेख यांनी सांगितले..Smart Village : काटेवाडी, सोरतापवाडी गावे होणार ‘स्मार्ट’.संकेतस्थळावर सर्व माहितीग्रामविकास कामांची माहिती संकेतस्थळावर दिली जाते. मंजूर कामे, होणारी कामे, झालेल्या कामांवरील खर्च आदींची इत्थंभूत माहिती संकेतस्थळावर आहे. त्यापुढे जाऊन गावाचे स्वतंत्र अॅप विकसित केले असून ते प्ले स्टोअरकडे व्हेरीफिकेसनसाठी पाठवले आहे. त्यानंतर लवकरच अॅपवरुनच गावाचा कारभार सुरु होईल, असे ग्रामविकास अधिकारी महेश देवर्षे यांनी सांगितले. ग्रामस्थांना सध्या संकेतस्थळावर घरबसल्या ऑनलाइन तक्रार करता येत आहे. संकेतस्थळावरच तक्रार निवारण, शासकीय माहिती, योजना, जन्ममृत्यू दाखले, महत्त्वाचे दस्तऐवज आणि गावातील दैनंदिन अपडेट उपलब्ध करून देत पारदर्शकता निर्माण केली आहे..गावातील विविध व्यवसाय, व्यावसायिकांचे संपर्क क्रमांक आदींची माहिती आहे. सेवांसाठी फाइव्हस्टार रेटिंग ठेवले आहे. लवकरच ही माहिती अॅपवर उपलब्ध होईल. अॅपला एआय तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. यामुळे ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळतील. विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांचीही तयारीही संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. मार्गदर्शनाचे व्हिडिओसह परीक्षाही अॅपवरून घेण्याचे नियोजन आहे. परीक्षेतील गुणवंतांना ग्रामपंचायतींकडून रोख बक्षीस देण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गावात वृक्षारोपण, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व वीजबचतीसाठी सौरऊर्जेवरील पथदिवेही बसवण्यात आले आहेत. येत्या काळात घनकचरा व्यवस्थापन व कंपोस्ट खत निर्मितीचेही नियोजन असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी महेश देवर्षे यांनी सांगितले..Smart Village : निगवे दुमाला ठरले स्वच्छ, सुंदर गावचा आदर्श नमुना.कबरस्तान होणार ‘आयएसओ’गावातील कब्रस्तानामध्ये सात वर्षापूर्वी शंभर नारळाच्या झाडांची लागवड करण्यात आली. या झाडांपासून आता दरवर्षी पन्नास हजारांचे उत्पन्न मिळते. हा निधी कबरस्तानामधील सुविधांवर खर्च केला जात आहे. वीज, पथदिवे, रस्ते, बसण्याची ओटे आदी सुविधा आहेत. कबरस्तानामध्ये लहान-मोठा किंवा गरीब- श्रीमंत असा भेद केला जात नाहीत. सर्वांच्या सहमतीने हा भेद दूर करण्यात यश आल्याचे सरपंच रुक्सानाबी शेख यांनी सांगितले..कबरस्तानातील नारळाच्या झाडांना आता आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या कबरस्तानाला आता आयएसओ मानांकन मिळवण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न सुरू आहे. कबरस्तानासोबत गावातील अन्य स्मशानभूमीमध्येही दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. गेल्या वर्षी ग्रामपंयातीला आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत अहमदपूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला. सध्या गाव जिल्हास्तरीय स्पर्धेत असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी महेश देवर्षे यांनी दिली..Maharashtra Smart Village: प्रत्येक तालुक्यात दहा गावे स्मार्ट, इंटेलिजंट करणार.केळी लागवडीला ‘मनरेगा’चा आधारगावाच्या शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड असली तरी अलिकडे शेतकऱ्यांनी केळी लागवडीस प्राधान्य दिले. मात्र, त्यांना बाजारातील चढउताराचा फटका बसू लागला. काही वेळा केळीतून काहीच उत्पन्न मिळत नव्हते. यामुळे ग्रामपंचायतीने या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून आधार दिला. योजनेतून केळी लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. योजनेत केळीच्या रोप खरेदीपासून तीन वर्ष मजुरी व अनुदान मिळते. दोन वर्षांपासून कृषी विभागाकडून ही योजना गावात राबवली जात आहे. एका एकरासाठी साठ हजार रुपये ‘मनरेगा’तून मिळतात. उत्पादन खर्चासाठी ‘मनरेगा’तून मदत मिळत असल्याने गावातील अनेक शेतकरी केळी लागवडीसाठी पुढे येत आहेत. सध्या गावशिवारात ७० हेक्टरपर्यंत केळी लागवड झाली आहे. उत्पादन खर्चाला आधार मिळाल्याने केळी विक्रीतून आलेला शंभर टक्के नफा शेतकऱ्यांच्याकडे जमा होत आहे..विविध पिकांची लागवडअनेक शेतकरी आता विविध पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. काही शेतकऱ्यांनी सुबाभूळ लागवड केली आहे. ही सुबाभूळ तीन वर्षांत तोडणीला येते. त्याचा उपयोग कागद तयार करण्यासाठी केला जातो. अनेक शेतकऱ्यांनी कंपन्यांसोबत करार करून सुबाभूळ लागवड केली आहे. सुबाभळीचा चारा शेळीसाठी उपयुक्त आहे. एका एकरातून ७० हजारांचे उत्पन्न मिळते. काही शेतकऱ्यांनी निलगिरीची लागवड केली आहे. उसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे गावच्या शिवारात अकरा गुऱ्हाळे आहेत. त्यामुळे अनेकांना गुऱ्हाळामुळे गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे.भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांगे व कलिंगडाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे..दृष्टिक्षेपात शिवणखेड ...भौगोलिक क्षेत्र ः ९९० हेक्टर. यांपैकी लागवड योग्य क्षेत्र ९८३ हेक्टरलोकसंख्या ः ३,२०९कुटुंब संख्या ः ६६०प्रमुख पिके ः ऊस, केळी, भाजीपाला, सोयाबीन, हरभरा, ज्वारीखरीप, रब्बी क्षेत्र ः ७०० हेक्टर ऊस, फळबाग ११० हेक्टर, भाजीपाला व इतर पिके १७३ हेक्टर.रुक्सानाबी शेख, सरपंच९५२७५६१९६६महेश देवर्षे, ग्रामपंचायत अधिकारी८३९०५२१२६३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.