अकोला ः राज्य शासनाने धनगर (एनटी - क) साठी २०२२-२३ वर्षासाठी सुरु केलेल्या राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा कालावधी वाढवावा. त्यातील क्लिष्ट अटी सुद्धा वगळण्यात, अशी मागणी मेंढपाळ पूत्र आर्मीतर्फे सौरभ हटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पशुसंवर्धन खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा कालावधी हा १५ ते ३० नोव्हेंबर देण्यात आला होता. मात्र, या योजनेची वेबसाइट ही २१ नोव्हेंबरपर्यंत कार्यान्वितच नव्हती. योजनेसाठी तयार करण्यात आलेले अॅप हे अजून सुद्धा कार्यान्वित केलेले नाही. अनेक मेंढपाळांनी अॅप काम करीत नाही. त्यामुळे योजना आलीच नाही, असा गैरसमज करून घेत या योजनेसाठी अर्जच केलेला नाही. त्यामुळे मेंढपाळ लाभापासून वंचित राहिले आहेत.
मेंढपाळांच्या दृष्टीने अन्यायकारक ठरत असलेल्या अटी वगळून योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर करावी. या योजनेच्या प्रभावी प्रचार, प्रसारासाठी स्वतंत्र्य व्यवस्था उभी करावी, अशीही मागणी केली आहे.
...या अटी आहेत मारक
‘लग्नाची अट’ या कॉलममध्ये अपत्यांची संख्या शून्य टाकली असता पुन्हा प्रश्न क्रमांक १३ मध्ये १ मे नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या विचारलेली आहे. जमीन असणे अनिवार्यच आहे का, असाही प्रश्न तयार झाला आहे. ज्या मेंढपाळांकडे जमीन नाही अथवा जे मेंढपाळ भाडेपट्ट्यावर जमीन घेऊ शकत नाहीत आणि जे फक्त सदैव भटकंती करीत असतात, अशा भूमिहीन मेंढपाळांनी काय करावे.
यामध्ये दोन अपत्यांची अट कशासाठी टाकली हाही प्रश्नच आहे. दोन अपत्ये ही अट आडकाठी ठरते आहे. या सोबतच पोर्टलवर व्यक्ती परत्वे अनेक अडचणी उद्भवत आहेत. मेंढपाळांना अर्ज भरण्यासाठी जंगलातून शहरात, गावात यावे लागते. परंतु अडचणींमुळे अर्ज न भरता पुन्हा जंगलात जावे लागते. अशावेळी त्यांना पुन्हा पुन्हा जंगलातून गाव-शहरात ये-जा करावी लागते. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, असे निवेदनात नमूद आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.