Crop insurance : विम्याची हजार रुपयांपेक्षा कमी भरपाई

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमबाबीअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात पीक नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Soybean Damage
Soybean DamageAgrowon

परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (Crop Insurance) स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) या जोखीमबाबीअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) पीक नुकसानीच्या (Crop Damage) पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Soybean Damage
Crop Insurance : देशातून सर्वाधिक महाराष्ट्रात ५५ लाख सूचनांची घेतली दखल

परभणी १३ हजार ८९९ आणि हिंगोली जिल्ह्यातील ६ हजार ६७० असे दोन जिल्ह्यांतील मिळून एकूण २० हजार ५६९ शेतकऱ्यांना मंजूर विमा भरपाईची रक्कम १ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा झाली आहे. त्या शेतकऱ्यांमधून विमा कंपनीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर स्थिती या नैसर्गिक संकटांमुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी विमा भरपाईसाठी ४ लाख ९० हजार ४८६ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केलेल्या आहेत.

Soybean Damage
Crop Insurance : कृषी आयुक्तांच्या आदेशालाही तिलांजली

सर्वेक्षणानंतर गणना करून ३ लाख ४९ हजार १८७ शेतकऱ्यांना ७२ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपये परतावा निश्चित करण्यात आला. अजून १ लाख ४१ हजार २९९ पूर्वसूचनांची परताव्याची गणना बाकी होती. सोमवार (ता. २१) पर्यंत ३ लाख १४ हजार २०५ शेतकऱ्यांना ६६ कोटी ५० लाख रुपये अदा करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४ लाख ४७ हजार ८४२ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केलेल्या आहेत. त्यापैकी ३ लाख ६६ हजार ३९४ शेतकऱ्यांना ९६ कोटी ३५ लाख रुपये परतावा निश्चित करण्यात आला. अजून ८१ हजार ४४८ पूर्वसूचनांची परताव्याची गणना बाकी होती.

आजवर ३ लाख ४१ हजार ८५१ शेतकऱ्यांना ८८ कोटी ३५ लाख ९४ हजार रुपये अदा करण्यात आले. १ हजार रुपये पेक्षा कमी विमाभरपाई मिळालेल्या परभणी जिल्ह्यातील १३ हजार ८९९ शेतकऱ्यांची परताव्याची रक्कम ६५ लाख ८५ हजार रुपये तर हिंगोली जिल्ह्यातील ६ हजार ६७० शेतकऱ्यांची परताव्याची रक्कम ३७ लाख ४८ हजार रुपये आहे.

विमा भरपाई कमी मिळण्याची कारणे...

काही शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक विमाअर्जाद्वारे पीक संरक्षण विमा घेतले आहे. काही अर्जाद्वारे विमा संरक्षित क्षेत्र हे एक गुंठा किंवा त्यापेक्षाही कमी असल्यामुळे नुकसानभरपाई ही अत्यंत अल्प म्हणजे अगदी एक रुपया देखील येऊ शकते, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com