Bogus Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Fertilizer : सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या १४०० नमुन्यांची तपासणी

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात खते, बियाणे आणि कीटकनाशकांमध्ये अप्रमाणितपणा (बनावट) आढळून आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश दुकानांमध्ये विक्रीसाठी आलेल्या १४०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

त्यामध्ये खतांचे सर्वाधिक ३८, बियाणे ९ आणि कीटकनाशकांचे ५ नमुने बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तपासणीमध्ये त्रुटी आढळल्याने ५२ नमुन्यांप्रकरणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

खरिपासाठी कृषी विभागाने खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे. खतांचा पुरवठा आणि विक्री होताना शेतकऱ्‍यांना त्रास होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यात आली. जिल्ह्यात खताचे होलसेल व किरकोळ असे मिळून ५ हजार १७५ वितरक आहेत. हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर मेपासून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता.

निविष्ठा गुणनियंत्रण कामकाजासाठी जिल्ह्यात गुणनियंत्रण निरीक्षक व ११ भरारी पथकांमार्फत निविष्ठा वितरकांची तपासणी व बियाणे, खते, औषधांचे नमुने काढण्याची कार्यवाही करण्यात आली. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर काही वितरकांनी विहित कालमर्यादेत परवाना नूतनीकरण केलेले नसल्याचे स्पष्ट झाले.

परवान्याची मुदत संपल्यानंतरही दुकानातून विक्री करण्यात आली, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. पेरण्या झाल्या नसल्या तरी कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीसाठी आलेली खते, बियाण्यांची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

जिल्ह्यात तीन प्रकारचे चौदाशे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. खतांचे तब्बल ११०० नमुने तपासले असून, त्यापैकी ३८ नमुने अप्रमाणित असल्याचे आढळून आले. बियाणांच्या ३३५ नमुन्यांनंतर ९ बनावट आणि कीटकनाशकांच्या २१३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पाच नमुने बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे सदोष खते, बियाणे आणि कीटकनाशकास विक्री बंदचे आदेश देण्यात असून याप्रकरणी संबंधित कंपन्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना युरियाची गोणी जादा दराने विकत घ्यावी लागली होती, परंतु जादा दराने खते विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT