Bogus Fertilizer Supply : बोगत खत पुरवठा प्रकरणी गुजरातच्या बड्या कंपनीचा राज्य परवाना रद्द

Sardar Agro Fertilizer : गुजरात मोरबी येथील सरदार ॲग्रो फर्टिलायझर या कंपनीवर नाशिक कृषी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
Bogus Fertilizer Supply
Bogus Fertilizer Supplyagrowon

Maharashtra News : राज्यात मागच्या दोन महिन्यांपासून बोगस बियाणे आणि बोगस खतांचा साठा जप्त करण्यात आहे. राज्यातील नाशिक आणि जळगावमध्ये सर्वाधिक प्रमाणात याबाबत तक्रारी आल्या आहेत. दरम्यान गुजरातमधील एका कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. गुजरात मोरबी येथील सरदार ॲग्रो फर्टिलायझर या कंपनीवर नाशिक कृषी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जळगाव जिल्ह्याच्या ६ तालुक्यातील ६२८ शेतकऱ्यांचे ९९७.२० हेक्टरबाधित झाल्यामुळे या कंपनीचा राज्य परवाना निलंबित करण्यात आला आहे. या सोबत जिल्ह्यातील एक घाऊक व ४ किरकोळ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विक्रेत्यांकडे असलेल्या ४५१ टन खतसाठा विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली आहे.

सरदार ॲग्रो फर्टिलायझर कंपनीचे जबाबदार व्यक्ती व संबधीत ४ खत विक्रेत्यांवर जामनेर पोलीस स्टेशन येथे कृषी विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस खतामुळे बाधीत झालेल्या शेतांचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून त्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

जिल्हाभरात गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत २९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले असून त्यापैकी ९ नमुने तपासणीत अप्रमाणित आढळून आले आहेत. अप्रमाणित खत व बियाणे विक्रीतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात.

यामुळे नुकसान देखील सहन करावे लागत असते. दरम्यान कृषी विभागाने फसवणुकीचे प्रकार घडू नये म्हणून विशेष लक्ष ठेवले असून, शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास कृषी केंद्र चालकांचे परवाने रद्द केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Bogus Fertilizer Supply
Bogus Fertilizer : बनावट खतांमुळे नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

तर या क्रमांकावर संपर्क करा

खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडून खते, बियाणे व किटकनाशकांची खरेदी करावी. तसेच खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे. जिल्हयात विनापरवाना निविष्ठांची विक्री कोणी करत असेल तर कृषी विभागाच्या भ्रमणध्वनी क्रमांक ९८२२४४६६५५ व दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९०५४ वर माहिती द्यावी.

बनावट बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची विक्री तथा जादा दराने कृषी निविष्ठांची विक्री करीत असल्यास किंवा कोणत्याही विक्रेत्याने शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास अशांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशाराही कृषी अधिकारी वाघ यांनी दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com