Amravati News : यवतमाळमध्ये दोन पोते बेकायदेशीर खताची पोती जप्त करण्यात आल्यानंतर त्या आधारे मिळालेल्या टीपवरून कृषी विभागाच्या पथकाने माहुली जहांगीर येथे कारवाई करीत तब्बल २ कोटी ३८ लाख रुपयांचा अनधिकृत, अप्रमाणित खतांचा साठा जप्त केला. शनिवारी (ता.१९) याप्रकरणी आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्र अशा विविध राज्यांतील तब्बल पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी (ता.१८) यवतमाळ दौऱ्यावर होते. याच दरम्यान गुप्त माहिती मिळाल्याने यवतमाळचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांच्या सूचनेनुसार कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी छापेमार कारवाई केली. यात अनधिकृत दोन खतांची पोते मिळून आली.
तेथे उपस्थितांच्या चौकशीत अमरावती जिल्ह्यात खत तयार करण्याचा बोगस कारखानाच असल्याचे कळाले. त्यामुळे तत्काळ ही माहिती अमरावती येथील कृषी विभागाच्या पथकाला देण्यात आली.
पथकाने विलंब न करता माहुली जहांगीर येथील अनंत काशीनाथ वाडोकार यांच्या शेतात छापेमारी केली. या कारवाई १ कोटी ९८ लाख २९ हजार रुपयांचे रासायनिक खत त्यासोबतच दोन ट्रक व इतर साहित्य ४० लाख ७० हजार असा एकूण २ कोटी ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खताच्या ५०० छापील रिकाम्या बॅग, पॅकिंग साहित्य देखील या ठिकाणी होते. याप्रकरणी सुनील कुमार (उत्तर प्रदेश), अडपाल सांभा शिवराव (रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश), अनंत काशीनाथ वाठोडकर, पुरुषोत्तम वासुदेव साबळे (रा. अमरावती), महेश कुमार (रा.भोपाल, मध्य प्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अमरावती पंचायत समितीचे खते निरीक्षक उद्धव संतराम भायेकर यांनी तक्रार दिली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.