Niphad Sugar Mill Agrowon
ताज्या बातम्या

Niphad Sugar Mill : थकित वेतनप्रश्नी ‘निसाका’ कर्मचारी आक्रमक

Latest Agriculture News ; थकित देणी मिळविण्यासाठी कामगारांनी सुरू केलेले साखळी उपोषण कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसून आंदोलनात पुढच्या टप्प्यात रास्ता रोको व निफाड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील प्रस्तावित ड्रायपोर्टसाठी निफाड सहकारी साखर कारखान्याच्या १०५ एकर जमीन विक्रीतून उपलब्ध झालेल्या १०८ कोटी रुपयांच्या रकमेतून कारखाना कामगारांची थकित ८१ कोटींची देणी द्यावीत, या मागणीसाठी कामगारांनी मंगळवारपासून (ता. २६) भाऊसाहेबनगर येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेसमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. संघटनेचे अध्यक्ष विलास आंधळे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक, कारखान्याचे अवसायक कामगारांची थकित देणे देण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला.

कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला दिल्यामुळे आता मालक जिल्हा बँक आहे, असे अवसायक म्हणतात. थकित देणी मिळविण्यासाठी कामगारांनी सुरू केलेले साखळी उपोषण कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसून आंदोलनात पुढच्या टप्प्यात रास्ता रोको व निफाड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

कारखाना कामगारांची फसवणूक करणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला धडा शिकवणार असल्याने कारखान्याचा खरा मालक कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कारखाना चालवायला घेताना कामगारांची थकित देणी व सेवाशर्ती व याबाबत त्रिपक्षीय करार करणे कायद्याने बंधनकारक होते.

परंतु जिल्हा मध्यवर्ती बँक व बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी कराराबाबत कामगारांची फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला. कामगार संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सोमनाथ गडाख, सरचिटणीस पाटील यांनी साखळी उपोषण व आंदोलनाची भूमिका विशद केली.

काही कामगारांकडून अडवणुकीची भूमिका : गोडसे

निफाड सहकारी साखर कारखाना पूर्ववत चालू करणे, हे आम्ही आपले सामाजिक दायित्व समजले आहे. नफा मिळवणे किंवा धंदा करणे, हा आपला हेतू नाही. आधी शेतकरी नंतर कामगार आणि त्यानंतरच कंपनीचे हित असा प्राधान्यक्रम ठेवलेला आहे.

अद्याप हा कारखाना सुरू झालेला नसताना काही कामगारांकडून अडवणुकीची भूमिका घेतली जात आहे. कामगारांचा वाद हा जिल्हा बँकेशी असताना आम्हाला त्या वादात ओढले जात आहे. ‘निसाका’च्या कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार हेमंत गोडसे बोलत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT