Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : विदर्भातील पाच जिल्ह्यांतील कृषिपंपांना दिवसा वीज

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यांमधील कृषिपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीजपुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

टीम ॲग्रोवन

चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यांमधील कृषिपंप (Agriculture Pump) ग्राहकांना दिवसा (Day Time Electricity) १२ तास ३ फेज वीजपुरवठा (Power Supply) करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबत केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ३० नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना आदेशित केले आहे.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर हे पाच धान उत्पादक जिल्हे असून, शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करताना वन्यप्राण्यांचा धोका असतो. तसेच कृषिपंपासाठी ८ तासांच्या वीज उपलब्धतेमुळे धानपिकास पुरेशा प्रमाणात सिंचन होत नाही.

कृषिपंपासाठी रोज ८ तासांच्या वीज उपलब्धतेऐवजी या जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास ३ फेज वीजपुरवठा करण्याची विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. उपमुख्यमंत्र्यांनी या विनंतीची त्वरित दखल घेत कृषिपंपांना दिवसा १२ तास ३ फेज वीजपुरवठा करण्याचे निर्देश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT