Agriculture Electricity : शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे थांबवा

शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज बिले थकीत असल्याने कनेक्शन तोडण्याचे तसेच वीज बिलांच्या वसुलीचे काम सध्या महावितरणने हाती घेतले आहे.
Electricity Bill Recovery
Electricity Bill RecoveryAgrowon
Published on
Updated on

पाचोरा, जि.जळगाव ः शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज बिले (Electricity Bill Recovery) थकीत असल्याने कनेक्शन तोडण्याचे तसेच वीज बिलांच्या वसुलीचे काम सध्या महावितरणने हाती घेतले आहे. मात्र, शेतकरी (Farmer) सध्या अडचणीत असल्याने त्यांचे वीज कनेक्शन तोडू नये व सक्तीची वीज बिल (Electricity Bill) वसुली देखील करू नये, अशी मागणी येथील भारतीय जनता पक्षाने केली आहे.

या संदर्भात भाजपतर्फे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शेवटी ऐन शेती मालाचे उत्पन्न हाती येण्याच्या वेळी अतिवृष्टीमुळे नुकसान सोसावे लागले.

Electricity Bill Recovery
Electricity Bills : शिरूर महावितरण विभागाकडून रीडिंग न घेता जादा बिले

शेतकरी आर्थिक संकटात सापडले. आता शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगाम हाच एक पर्याय असताना काही ठिकाणी गहू, मका, हरभरा, सोयाबीन व बाजरीची लागवड सुरु आहे. तर काही ठिकाणी लागवड पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत जमिनीला लागवडीयोग्य करण्यासाठी तसेच पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी असले तरी कोणतीही पूर्वसूचना न देता, कृषी पंपांच्या तोडल्या गेलेल्या विजेच्या कनेक्शनमुळे ते देता येत नाही.

अशातच सक्तीची वीज बिल वसुली देखील केली जात आहे. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर महिनाभर दुरुस्त करून मिळत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील थकबाकीसाठी शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचे वीज कनेक्शन तोडू नये अशी सूचना दिलेली होती. मात्र, तरीही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्यामुळे महावितरणाच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा अमोल शिंदे यांनी निवेदनात दिला आहे.

निवेदन देतेवेळी त्यांच्यासोबत भाजपचे भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, रमेश वाणी, गोविंद शेलार, बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील, दीपक माने, समाधान मुळे, भैया ठाकूर, राहुल गायकवाड, रहीम बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com