Election Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : अकोल्यात २६६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

अकोला : जिल्ह्यातील सात तालुक्यांतील २६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला : जिल्ह्यातील सात तालुक्यांतील २६६ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान (Voting) होणार आहे. यासोबतच जिल्ह्यात घोषणेनंतर आचारसंहिता लागू झाली असून, २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.

निवडणूक होत असलेल्या तालुक्यात सर्वाधिक ५४ ग्रामपंचायतींसाठी अकोला तालुक्यात मतदान होणार आहे. तर सर्वांत कमी ग्रामपंचायती तेल्हारा तालुक्यात २३ आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित अकोला जिल्ह्यातील सर्व २६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबरला संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील.

नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत सात डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. अकोला जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे.

नवीन सरकार आल्यानंतर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतींवर सत्ता असणे हे सर्वच राजकीय पक्षांसाठी सोयीचे मानले जाते.

तालुकानिहाय ग्रामपंचायती

तालुके ग्रामपंचायती

अकोला ५४

अकोट ३७

बाळापूर २६

बार्शीटाकळी ४७

मूर्तिजापूर ५१

पातूर २८

तेल्हारा २३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT