Gram Panchayat Election : सात हजारांवर ग्रामपंचायतींची १८ डिसेंबरला रणधुमाळी

राज्यातील विविध जिल्ह्यांतील सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुका १८ डिसेंबर रोजी होतील.
Election
ElectionAgrowon
Published on
Updated on

मुंबई : ‘‘राज्यातील विविध जिल्ह्यांतील सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुका १८ डिसेंबर रोजी होतील. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल,’’ अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त (Election Commissioner) यू. पी. एस. मदान यांनी दिली.

Election
Agriculture Electricity : चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात शेतीला मिळणार दिवसा वीज

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर, २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करणार आहेत.

Election
College of Agriculture : बारामती कृषी महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश

२८ नोव्हेंबर, २०२२ ते २ डिसेंबर, २०२२ या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी पाच डिसेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत राहील. १८ डिसेंबर, २०२२ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागांत सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान होईल.

ग्रामपंचायतींची जिल्हा निहाय संख्या

नगर २०३

अकोला २६६

अमरावती २५७

औरंगाबाद २१९

बीड ७०४

भंडारा ३६३

बुलडाणा २७९

चंद्रपूर ५९

धुळे १२८

गडचिरोली २७

गोंदिया ३४८

हिंगोली ६२

जळगाव १४०

जालना २६६

कोल्हापूर ४७५

लातूर ३५१

नागपूर २३७

नंदुरबार १२३

उस्मानाबाद १६६

पालघर ६३

परभणी १२८

पुणे २२१

रायगड २४०

रत्नागिरी २२२

सांगली ४५२

सातारा ३१९

सिंधुदुर्ग ३२५

सोलापूर १८९

ठाणे ४२

वर्धा ११३

वाशीम २८७

यवतमाळ १००

नांदेड १८१

नाशिक १९६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com