Gram Panchayat Election  Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : दापोलीतील ३० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

दापोली तालुक्यातील १०६ पैकी ३० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी आधीच तयारी सुरू केली

टीम अॅग्रोवन.

दाभोळ : दापोली तालुक्यातील १०६ पैकी ३० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक (Gram Panchayat Election) जाहीर झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी आधीच तयारी सुरू केली असल्याने या निवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व होते; मात्र आता शिवसेनाच दोन गटांत विभागली गेली असल्याने कोणता गट या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवितो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ग्रामपंचायत व सरपंचनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे ः आगरवायंगणी (सर्वसाधारण), आपटी (सर्वसाधारण महिला), उसगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), उंबरशेत (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), उंबर्ले (सर्वसाधारण), करजगाव (अनुसूचित जमाती), कळंबट (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), कादिवली (सर्वसाधारण), कुडावळे (सर्वसाधारण), करंजाणी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), कोळबांद्रे (सर्वसाधारण), जालगाव (सर्वसाधारण), दमामे (सर्वसाधारण स्त्री), देगांव (सर्वसाधारण महिला),

देहेण (सर्वसाधारण महिला), टाळसुरे (सर्वसाधारण महिला), पाचवली (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), बोंडीवली (सर्वसाधारण), भडवळे (सर्वसाधारण महिला), मुर्डी (सर्वसाधारण महिला), वाझंळोली (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), वेळवी (सर्वसाधारण), विरसई (सर्वसाधारण महिला), शिर्दे (सर्वसाधारण), शिरसाडी (अनुसूचित जाती), सडवे (सर्वसाधारण), सातेरे तर्फे नातू (सर्वसाधारण), सारंग (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), सोवेली (सर्वसाधारण), हातीप (सर्वसाधारण महिला).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy: अमरावती जिल्ह्यात घरकुलांमध्ये मिळणार सौर ऊर्जेचा लाभ

Crop Insurance: सरासरी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Flaxseed Farming: धान उत्पादक चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची जवसाला पसंती

Summer Moong Crop: कमी कालावधीत येणारे उन्हाळी मुगाचे ९ वाण

Soybean Procurement: सांगलीत दोन केंद्रांवर सतराशे क्विंटल सोयाबीन खरेदी

SCROLL FOR NEXT