Gram Panchayats Election Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींत निवडणूक

निवडणूक आयोगाने राज्यातील सात हजार ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला.

Team Agrowon

कोल्हापूर ः निवडणूक आयोगाने (Election Commisiion) राज्यातील सात हजार ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा (Gram Panchayat Election) कार्यक्रम जाहीर केला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल; तर १८ डिसेंबरला मतदान आहे. मतमोजणी २० डिसेंबरला होईल.

कोरोनामुळे लांबलेल्या व सदस्यांची मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच झाल्या आहेत. तथापि, नोव्हेंबर, डिसेंबरअखेर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या विद्यमान सभागृहाची मुदत संपत आहे. अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमायचा की निवडणुका घ्यायच्या, याविषयी राज्य निवडणूक आयोगात चर्चा सुरू होती. अखेर या दोन महिन्यांत मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील ४२९, तर डिसेंबरमध्ये ४५ ग्रामपंचायतींच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ संपत आहे.

४७५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार

जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ या दोन महिन्यांत संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला. करवीर तालुक्यातील वडणगे, पाचगाव, उचगाव, कळंबा या मोठ्या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stock Market Risk: कर्ज काढून शेअर्समध्ये गुंतवणूक धोकादायक

Pulses Mission: धोरणात्मक बदलाशिवाय कडधान्य मिशन कुचकामी

India US Trade: हुलकावणी देणारा व्यापार करार

Direct Fertilizers Subsidy: थेट अनुदान योजना चांगली, पण...

Cotton Registration: हमीभावाने कापूस नोंदणीला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT