Gram Panchayats Election : नांदेडमधील १८१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

जिल्ह्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
Gram Panchayats Election
Gram Panchayats ElectionAgrowon
Published on
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा (Gram Panchayat Election ) कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात थेट सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. १८ डिसेंबर रोजी मतदान (Voting) होणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देश प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्याची निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.

Gram Panchayats Election
Sugar Export: महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी गोड बातमी

निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या कालावधीत मतदारावर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम असा...

ता. १८ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, ता. २८ नोव्हेंबर ते ता. दोन डिसेंबर या कालावधीत सकाळी साडेअकरा ते दुपारी तीन पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, ता. पाच डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी, ता. ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेऊन त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होणार, ता. १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होऊन ता. २० डिसेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.

Gram Panchayats Election
Gram Panchayat Election : अकोल्यात २६६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

तालुकानिहाय १८१ ग्रामपंचायती...

नांदेड जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या १८१ ग्रामपंचायतमध्ये अर्धापूर २, उमरी १, कंधार १६, किनवट ५३, देगलूर १, धर्माबाद ३, नांदेड ७, नायगाव ८, बिलोली ९, भोकर ३, माहूर २७, मुखेड १५, मुदखेड १, लोहा २८, हदगाव ६ व हिमायतनगर १ या गावांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com