Eknath shinde agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2023 : प्रथमच विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून शासकीय महापूजा

Eknath shinde : आषाढी एकादशीनिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली.

Team Agrowon

Vitthal Mahapooja : आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा शासकीय महापूजेचा मान अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व मंगल काळे यामानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते प्रथेनुसार महापूजा करण्यात आली.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्या आणि लाखो वारकरी पंढरपूरात दाखल झाले. आषाढी एकादशीला होणारी शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणारी होती. त्यामुळे ते बुधवारी दुपारीच दाखल झाले होते. रात्री मंदिर समितीची पाद्यपूजा आणि नित्यपूजा झाल्यावर शासकीय महापूजेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे आज पहिल्यांदा विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे या मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. 

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांना विठ्ठल-रूक्मिणीच्या महापूजेचा मान मिळाला आहे. आज एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन व्हावे, यासाठी ते सकाळी ६ वाजल्यापासून रांगेत उभे राहिले होते. गेल्या ३० वर्षांपासून करोनाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता न चुकता त्यांनी जोडीने वारी केली असल्याचे सांगण्यात आले.

बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस यावेत. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा. पाऊस पडू दे, प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी घातली.

शासकिय महापूजेला खासदार श्रीकांत शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT