Ashadhi Wari 2023: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी ५ हजार विशेष बस

Pandharpur Ashadhi Wari : आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळतर्फे ५ हजार विशेष बस चालवण्यात येत आहे.
ST Recruitment
ST Recruitment Agrowon
Published on
Updated on

Pandharpur Ashadhi Wari : आषाढी एकादशीनिमित्त टाळ-मृदुंगाच्या तालावर लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. तसेच इतर भाविकांना पंढरपूराला जाण्यासाठी एसटी महामंडळातर्फे २५ जून ते ०५ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बस चालवण्यात येत आहेत.

ST Recruitment
Insurance For Warkaris Scheme : वारकऱ्यांसाठी ५ लाखांचा विमा ; विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

विठ्ठलाच्या ओढीसाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने जात आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरामध्ये वैष्णवांचा मेळा भरला आहे. या यात्रेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, यात्रा काळात पंढरपूर परिसरात पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय अशा विविध सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तर वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. यात्रेसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून बसचे नियोजन करण्यात आले आहे.

यंदा या यात्रेसाठी २५ जून ते ०५ जुलै दरम्यान एसटीच्या विशेष गाड्या धावणार आहेत. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी मंगळवारी २०० अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद विभागातून १ हजार २००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १ हजार २००, नाशिक १ हजार आणि अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष बसचे नियोजन केले आहे.

ST Recruitment
आषाढी वारीसाठी यंदा ४ हजारांवर जादा एसटी

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

यात्रेनिमित्त राज्यातून पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी आणि भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com