Organic Farming Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : कर्ब वाढीसाठी प्रयत्न गरजेचे

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कार्यक्रमात पोपटराव पवार यांचे मत

Team Agrowon

नगर ः ‘‘शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाण्याच्या ताळेबंदाबरोबरच मातीचे व्यवस्थापन व्यवस्थित केले नाही, तर आपण कितीही विकासाचे गोडवे गायले तरीदेखील आपले प्रश्‍न सुटणार नाहीत. विद्यापीठाचा पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प हा देशाला दिशादर्शक ठरणार आहे, जमिनीतील सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) वाढविण्यासाठी प्रयत्न, ठरावीक पिकांचे उत्पादन घेऊन जमिनीला विश्रांती द्यायला हवी. जमिनीतील सूक्ष्म जिवांचे प्रमाण वाढविण्याबरोबरच मातीची धूप कमी करणे, पाणी व्यवस्थापन करणे यांसारखे उपाय योजून जमिनीचे आरोग्य (Soil Health) सुधारता येते,’’ असे मत आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात जागतिक मृदादिन व राज्यस्तरीय बीजप्रक्रिया स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा झाला. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे, नगरचे कृषी सहसंचालक रवींद्र माने, राहुरी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, यांच्यासह पदाधिकारी, कृषी विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khet Bachao Abhiyan: देशभरात २२ ऑक्टोबरपासून ‘शेत वाचवा' अभियानाला सुरुवात; केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, ओल्या भुईमुगाचे दर टिकून, फ्लॉवरच्या आवकेत बदल, मेथीच्या दरात चढ-उतार तर केळीचे दर स्थिर

Crop Damage Panchnama: दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू; केंद्राचे पथक लवकरच महाराष्ट्रात : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Drought Affected Farmers: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या

Urea Treatment: वाळलेल्या पिकांपासून घरच्या घरी बनवा जनावरांसाठी पौष्टिक चारा

SCROLL FOR NEXT