mpbcdc scheme agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur : अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उन्नतीसाठी प्रभावी योजना, असा करा अर्ज

Kolhapur District Schemes : ऑनलाईन अर्ज करताना काही अचडणी उद्भवल्यास info@mpbcdc.in या ई-मेल वर संपर्क साधावा असे आवाहन पवार यांनी केले आहे.

Team Agrowon

Mahatma Phule Backward Class Development Corporation : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर मार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहे. ही योजना २०२३-२४ अर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जाती मधील अनेकांना लागू असणार आहे.

यामध्ये हिंदू -महार, नवबौध्द, हिंदू-बुरुड, हिंदू -खाटीक, वाल्मीकी, मेहतर व बेडाजंगम या प्रवर्गामधील लाभधारकांना आर्थिक उन्नतीसाठी व व्यवसायीक प्रशिक्षणासाठी इच्छुक लाभार्थीना या योजना असणार आहे. याबाबत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एम. पवार यांनी आवाहन केले.

ते म्हणाले की, प्रशिक्षण योजना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये अनुदान योजनेसाठी ८०, बीजभांडवल योजनेसाठी ८०, प्रशिक्षण योजनेचे ३२० व एनएसएफडीसी योजनेचे उद्दिष्ट मुख्यालयाकडूल प्राप्त झाले आहे.

यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा कार्यालयांकरिता राज्य शासनाच्या अनुदान योजना, बीज भांडवल योजना प्रशिक्षण योजना तसेच एनएसएफडीसी योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षा करिता (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व संत रोहिदार चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडहा अंतर्गत येणाऱ्या जाती वगळता) ऑनलाइन पध्दतीने अर्ज http://nbmahapreit.in या पोर्टलवर अर्जदारांनी नोंद करावी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करताना काही अचडणी उद्भवल्यास info@mpbcdc.in या ई-मेल वर संपर्क साधावा असे आवाहन पवार यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT