Sub Inspector Kolhapur : जोतिबा डोंगरावरील पुजाऱ्याचा पोरगा पीएसआय झाला अन् वडिलांना अश्रू अनावर

sandeep Shirguppe

पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगरावर सामान्य कुटुंबात राहणाऱ्या सुशांत उपाध्ये हा मुलगा नुकताच पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाला.

Sub Inspector Kolhapur | agrowon

मुलांना त्यांनी कष्टातून शिकविले

सुशांतचे आई-वडील अल्पशिक्षित.. डोंगरावर पुजारी म्हणून सेवेत... परंतु गरिबीला कुरवाळत न बसता त्यांनी दोन्ही मुलांना त्यांनी कष्टातून शिकविले.

Sub Inspector Kolhapur | agrowon

मुलगा साहेब झाल्याचा आनंद

अन् काही दिवसांपूर्वी एक मुलगा नागपुरात पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू झाला. सुशांत साहेब झाल्याचा आनंद वडील शंकर उपाध्ये यांनी अश्रूंतून व्यक्त केला.

Sub Inspector Kolhapur | agrowon

दहावीत पहिला

सुशांतचे शालेय शिक्षण ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये झाले. २००७ मध्ये दहावीत ७५ टक्के गुण मिळवून पहिला आला. वारणानगरला महाविद्यालयीन शिक्षण झाले.

Sub Inspector Kolhapur | agrowon

राज्य परिवहन महामंडळात नोकरी

१२ वी नंतर कोल्हापुरातील विवेकानंद आणि शहाजी कॉलेजमधून बीसीए डिग्री घेतली. बीसीए द्वितीय वर्षात असताना आयबीपीएस परीक्षा उत्तीर्ण झाला. राज्य परिवहन महामंडळात नोकरीची संधी आली.

Sub Inspector Kolhapur | agrowon

अन् पीएसआय झाला

मात्र, त्याने पुढील शिक्षणासाठी ती नाकारली. सुशांतने २०१९ मध्ये एमपीएससीची पूर्वपरीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षाही उत्तीर्ण झाला.

Sub Inspector Kolhapur | agrowon

गुडघ्याची दुखापत

नाशिकच्या पोलिस अॅकॅडमीत गुडघ्याची दुखापत सहन करुन, खडतर ट्रेनिंग पूर्ण केली. त्याची नागपूरला पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

Sub Inspector Kolhapur | agrowon

डोंगरावर पहिलाच मुलगा एमपीएससी

सुशांत जोतिबा डोंगरावरील पहिला एमपीएससी पास झालेला मुलगा असल्याने त्याचा सर्वत्र सत्कार होतोय.

Sub Inspector Kolhapur | agrowon

पी.आर. कंपनीही सांभाळली

या दरम्यान तो विद्यापिठात पत्रकारिता केली. सेट, नेट झाला. एका पी.आर. कंपनीचा सह संस्थापक म्हणून त्याने काम पाहिले आहे.

Sub Inspector Kolhapur | agrowon

अन् खाकीवर स्टार लागले

सुशांतच्या खाकीवर स्टार लागले अन् तो फौजदार झाला. जोतीबाच्या डोंगरावरच्या गरीब पुजारी कुटुंबातला पोरगा प्रथमच मोठ्या पदावर गेल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

Sub Inspector Kolhapur | agrowon
ujani-dam | Agrowon
आणखी पाहा...