Vidarbh Flood Agrowon
ताज्या बातम्या

Vidarbh Rain : पूर्व विदर्भ परिसराला पुन्हा पावसाचा तडाखा

Vidarbh Rain Update : पूर्व विदर्भाला पुन्हा पावसाने झोडपले असून नागपूर शहर व परिसरात गेल्या २४ तासांत १६४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

Team Agrowon

Nagpur News : पूर्व विदर्भाला पुन्हा पावसाने झोडपले असून नागपूर शहर व परिसरात गेल्या २४ तासांत १६४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नागपूर शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले.

गेल्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली होती. परिणामी अनेक नद्या, नाल्यांना पूर येत घरांची पडझड झाली. सोबतच पिकांचेही नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेल्याने या क्षेत्रात दुबार पिकाबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे.

गुरुवारी (ता.२७) पुन्हा हवामान खात्याने पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. त्यानुसार बुधवार (ता.२६) मध्यरात्रीपासूनच नागपूर शहरात धो-धो पाऊस बरसला. परिणामी शहराच्या अनेक भागात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने शहरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले.

अनेक घरातील साहित्य पाण्याने भिजल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. नागपूर परिसरात गेल्या २४ तासांत १६४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात ६७, चंद्रपूर ६४.२, ब्रह्मपुरी ५६, यवतमाळ ४६.२, गडचिरोली ३३, गोंदिया ४.४, अमरावती ३.४, अकोला १.२ मिलिमीटर याप्रमाणे २४ तासांत नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्‍यात गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळत होता. प्रशासनाकडून चंद्रपूर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती.

वीज पडून ११ ठार

विदर्भात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. बुधवारी (ता.२६) चंद्रपूर जिल्ह्यात विविध घटनांमध्ये वीज पडून ८ ठार, तर ९ जखमी झाले. वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत देखील प्रत्येकी एक जण वीज पडून ठार झाला. त्यामुळे वीज पडून दगावणाऱ्यांची संख्या ११ झाली होती. वीज पडून तब्बल १४ व्यक्‍ती जखमी झाल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT