Wet Drought Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यात पाच कोटी २२ लाखांचे नुकसान

याचा सर्वाधिक फटका सातारा, जावळी, कोरेगाव, वाई, महाबळेश्‍वर व पाटण तालुक्यांतील सुमारे आठ हजार ७३५ शेतकऱ्यांना बसला आहे.

टीम ॲग्रोवन

सातारा : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे (Cloudburst Rainfall) जिल्ह्यातील दोन हजार ९४३ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे (Kharif Crop Damage) मोठे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका सातारा, जावळी, कोरेगाव, वाई, महाबळेश्‍वर व पाटण तालुक्यांतील सुमारे आठ हजार ७३५ शेतकऱ्यांना बसला आहे.

पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, पाच कोटी २२ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, शेतकऱ्यांचे डोळे या निर्णयाकडे लागले आहेत.

अवकाळी स्वरूपात अचानक होणाऱ्या पावसामुळे या वर्षी जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका सातारा, फलटण, जावळी, कोरेगाव, वाई, पाटण व महाबळेश्वर तालुक्यांना बसला आहे. त्यानंतर शासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले,

त्याची भरपाईची रक्कम मिळण्याआधीच सप्टेंबरमध्ये सहा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामध्ये खरिपातील अंतिम टप्प्यात असलेल्या पिकांचे नुकसान झाले. कोरेगाव तालुक्यात राजम्याचे मोठे नुकसान झाले.

तर इतर ठिकाणी घेवडा व कडधान्याचे नुकसान झाले आहे. या ढगफुटीचा सहा तालुक्यांतील आठ हजार ७३५ शेतकऱ्यांना बसला आहे. एकूण २०४२ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तर बागायती पिकांचे ८९८.१४ हेक्टर, तर फळ पिकांचे २.६ हेक्टरवर नुकसान झाले आहे. यातून जिल्ह्याचे पाच कोटी २२ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

नुकसानीची स्थिती (हेक्टरमध्ये) कंसात शेतकरी संख्या

जिरायती पिके २०४२ (६ हजार १८१)

बागायती पिके ८९८.१४ (२ हजार ५७६)

फळपिके २.६ (आठ)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT