KDCC Bank Scheme agrowon
ताज्या बातम्या

KDCC Bank Scheme : दुधाळ म्हैस योजना माहितीय का? कोल्हापूर जिल्हा बँक देतेय लाखो रुपयांचे कर्ज

Gokul Milk : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत केडीसीसी बँकेने दुधाळ योजना सुरू केली. त्यासाठी बँकेने ५०० कोटींचा तरतूद केली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur District Bank News : कोल्हापूर जिल्हा बँकेकडून सुरू करण्यात आलेल्या दुधाळ म्हैस कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या योजनेचा लाभ घेऊन दूध संकलनात वाढ करा, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील त्यांनी केले.

दुधाळ म्हैस कर्ज योजनेच्या मंजुरीपत्रांच्या वितरणावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने होते. याचबरोबर गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी गोकुळ संचालक युवराज पाटील म्हणाले की, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत केडीसीसी बँकेने दुधाळ योजना सुरू केली. त्यासाठी बँकेने ५०० कोटींचा तरतूद केली आहे. परराज्यातून आणलेल्या दुधाळ म्हशींसाठी एक लाख व दोन लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेत दूध संकलन वाढवावे असे पाटील म्हणाले.

यावेळी भैया माने म्हणाले, केडीसीसी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दूरदृष्टीतून बँकेकडे दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कारण पुण्या-मुंबईसह राज्यभर म्हशीच्या दुधाची मागणी असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात दूध वाढीसाठी हा प्रयोग करण्यात येत असल्याची माहिती माने यांनी दिली.

यावेळी सावर्डे खुर्द येथील अंबाबाई महिला सहकारी दूध संस्थेच्या सात जणांना मंजुरीपत्रांचे वाटप झाले. त्यांना ११ म्हशींसाठी ११ लाखांचे कर्ज मंजूर झाले. संस्थाध्यक्षा मंगल मालवेकर, सचिव पांडुरंग कदम, सागर मालवेकर, प्रवीण मालवेकर, महादेव मालवेकर, संतोष मोगणे, शामराव मालवेकर, संजय कदम, पांडुरंग कदम, भारती पसारे, सागर मोगणे, नामदेव मालवेकर प्रमुख उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत संदीप माळी (म्हाकवे), सुशांत पाटील ( बेलवळे खुर्द), बाजीराव कुदळे (उंदरवाडी), शंकर पाटील (चौडाळ), अजित हवलदार (लिंगनूर दुमाला), स्वागत पाटील (बानगे), विलास फराकटे (फराकटेवाडी) यांना पतपुरवठ्याची मंजुरीपत्रे दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT