
Kolhapur Jilha Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांसाठी नवी योजना राबवण्यात येत आहे. जातिवंत म्हैस खरेदी करण्यसााठी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान याबाबत जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी माहिती दिली.
जातिवंत म्हैस खरेदी कर्ज योजना अधिक प्रभावी व सक्षमपणे राबविण्यात येणार आहे. यामुळे जातिवंत म्हैस खरेदी करण्यासाठी सध्या कर्जाची रक्कम १ लाख आहे ती दिड लाख करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती माने यांनी दिली.
दरम्यान म्हैस कर्ज योजनेसंदर्भात गोकुळ दूध आणि जिल्हा बँक संचालक, अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक 'गोकुळ'च्या ताराबाई पार्क कार्यालयात नुकतीच झाली. या बैठकीत माने बोलत होते. विविध आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जातिवंत म्हैस खरेदी कर्ज योजनेसाठी ५०० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. आजपर्यंत ८२ कोटी कर्जाचे वाटप करण्यात आल्याचे माने यांनी सांगितलं.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळ मार्फत म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रम राबवत असून या कार्यक्रमा अंतर्गत म्हैस कर्ज प्रकरणे के.डी.सी.सी.बँके मार्फत केले जात आहे. ही प्रकरणे केली जात असताना प्रत्यक्ष कामाजात काही अडचणी दूध उत्पादकांना संस्था पातळीवरती येत आहेत. त्या तात्काळ सोडवाव्यात तसेच संघाचे अधिकारी बँकेचे अधिकारी यांनी एकत्र बैठक घेऊन बँकेच्या कर्ज योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी.
यावेळी म्हैस कर्ज प्रकरण प्रती जनावर खरेदी रक्कम १ लाख असणारी रक्कम वाढवून ती १ लाख ५० हजार रुपये करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या योजनेसाठी बँकेच्या व संघाच्या संयुक्त अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती डोंगळे यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.