Raju Shetty Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti : पूर्णा तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा

जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी पूर्णा येथील तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. १९) शेतऱ्यांनी बैलगाडीसह मोर्चा काढला.

टीम ॲग्रोवन

पूर्णा ः जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सरसकट दुष्काळ (Drought) जाहीर करावा या मागणीसाठी पूर्णा येथील तहसील (Collector Office) कार्यालयावर सोमवारी (ता. १९) शेतऱ्यांनी बैलगाडीसह मोर्चा काढला. राज्य शासन, कृषिमंत्री, केंद्र सरकार व पिकविमा कंपनीच्या (Crop Insurance Company) विरोधात या वेळी घोषणा दिल्या जात होत्या. जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

या मोर्चात बैलगाड्या मोठ्या संख्येने सहभागी होणार होत्या. परंतु लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे प्रातनिधिक स्वरूपात एकच बैलगाडी सहभागी करण्यात आली. तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्यने या मोर्चात सहभागी झाले होते. पूर्णा तालुक्यात सलग ४० ते ४५ दिवस सतत संततधार पाऊस पडला. पिकाची वाढ खुंटली होती.

त्यानंतर सोयाबीन फुलात व कोवळ्या शेंगाच्या अवस्थेत असताना २५ ते २८ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे पीक जागेवरच करपले. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला. या पार्श्‍वभूमीवर सरसकट दुष्काळ जाहीर करावा. विमा कंपनीला तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश द्यावेत.

लम्पी स्कीन आजाराने पीडित झालेल्या जनावरांना विमा देण्यात यावा. हेक्टरी ५० हजार रुपये या प्रमाणे दुष्काळी मदत देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू यांना निवेदन देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT