Maharashtra Drought  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Drought : कर्नाटकात दुष्काळ जाहीर, महाराष्ट्रात का नाही?

Vijay Wadettiwar : सध्या महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात चारा-पाण्याची टंचाई आहे.

Team Agrowon

Mumbai News : ‘‘सध्या महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात चारा-पाण्याची टंचाई आहे.

कर्नाटकातही अशीच परिस्थिती असताना तेथील सरकारने १९५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मग महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार राज्यात दुष्काळ का जाहीर करत नाही,’’ असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

‘‘राज्यात ३५८ पैकी १९४ तालुके हे दुष्काळाच्या छायेत असून १६ जिल्ह्यांमध्ये ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक प्रभावित भागात पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग (मध्य महाराष्ट्र) आणि उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे. सध्या जायकवाडीत गतवर्षीच्या ९६.७५ टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत केवळ ३४.५२ टक्के पाणीसाठा आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील उजनीत गेल्या वर्षीच्या १०० टक्क्यांच्या तुलनेत केवळ २३. ६५ टक्के पाणीसाठा आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक महसूल विभागातील धरणांमध्ये ६८.१२ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ३२.४५ टक्के आणि पुणे विभागात ७२.८७ टक्के पाणीसाठा आहे. बळीराजा अडचणीत आला असून महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांचे काही पडलेले नाही,’’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

‘महाराष्ट्र सरकार झोपलंय का ?’

‘‘शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. कर्जाचे पुनर्गठन सरकारने केलेले नाही. मग, महाराष्ट्र सरकार झोपलंय का? सर्वसामान्यांचे सरकार म्हणून थापा मारणारे मुख्यमंत्री निष्क्रिय आहेत.

अर्धे उपमुख्यमंत्री राजस्थान निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत आणि अर्धे त्यांच्या अखत्यारित न येणाऱ्या खात्यांच्या बैठका घेऊन स्वतःच्या आमदारांसाठी निधी पळविण्यात व्यस्त आहेत. हे सरकार स्वतःच्या कामात मश्गूल आहे. दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना त्यांच्याकडे या सुस्त सरकारचे लक्ष कधी जाणार,’’ असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT