Maharashtra Bhushan Award Ceremony
Maharashtra Bhushan Award Ceremony  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Bhushan : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

Team Agrowon

Maharashtra Bhushan Award : महाराष्ट्र सरकारच्यावतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांना देण्यात आला आहे.

देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समाजसेवेचा वारसा तीन पिढ्यांमध्ये राहणं, हे मी पहिल्यांदाच पाहतोय, असे म्हणत शाह यांनी धर्माधिकारी यांच्याबद्दर गौरोवोद्गार काढले.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्य हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले. राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार आहे. पुरस्कार प्रदानाच्या या कार्यक्रमासाठी राज्यभरातून अनुयायी आले होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले.

हा माझ्या कार्याचा गौरव - धर्माधिकारी

हा पुरस्कार माझ्या कार्याचा गौरव आहे, नानासाहेबांनी कष्ट केले, तुम्ही साथ दिली, त्यामुळे या पुरस्काराचे श्रेय तुम्हाला जाते.

एका घरात दुसरा पुरस्कार देणे, ही घटना महाराष्ट्रात कुठेही झाली नाही, असे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितलं. खेडेगावापासून आम्ही कामाची सुरुवात केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तीची जाहिरात करायची गरज काय आहे.

नानासाहेब वयाच्या ८७ वर्षापर्यंत काम करत होते. माझा श्वास असेपर्यंत हे कार्य सुरु राहणार आहे. माझ्यानंतर सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करेल, असे धर्माधिकारी म्हणाले.

आप्पासाहेबांच काम मोठं - अमित शाह

शाह म्हणाले की, समाजसेवकाच्या सत्काराला आलेला एवढा मोठा जनसमुदाय माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. त्याग, समर्पण आणि सेवेच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी मोठं काम केलं आहे. समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यांमध्ये राहतो, हे मी प्रथमच पाहत आहे. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारनं लाखो लोकांना प्रेरणा देण्याचे काम केल्याचे अमित शाह म्हणाले.

राजकीय सत्तेपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी - मुख्यमंत्री शिंदे

तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मी इथे मुख्यमंत्री म्हणून आलो नाही, तर मी आपल्या परिवारातला एक श्री सदस्य म्हणून या ठिकाणी उभा आहे.

महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च असा मानाचा पुरस्कार आप्पासाहेबांना गृहमंत्री महोदयांनी अर्पण केला. मी आप्पासाहेबांना या राज्यातल्या साडेबारा कोटी जनतेच्यावतीने धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं.

आप्पासाहेबांनी समाजाची सेवा करण्याचा मार्ग दाखवला. त्याचे मोठे योगदान मी कधीही विसरु शकणार नाही. लाखो कुटंब वाचवण्याचे काम त्यांनी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

खरी श्रीमंती संस्करात - उपमुख्यमंत्री फडणवीस

खरी श्रीमंती ही संस्कारांमध्ये आहे. ही श्रीमंती श्री परिवारामध्ये अनुभवायला मिळते. खऱ्या अर्थानं जगात श्रीमंत कोणी असाल, तर तुम्ही आहात.

कारण, नानासाहेब आणि आप्पासाहेब यांच्या विचारांची श्रीमंती घेऊन तुम्ही जीवन जगता आहात. म्हणून, मला वाटतं की तुमच्यापेक्षा श्रीमंत दुसरे कोणीच या ठिकाणी असू शकत नाही.

ज्या प्रकारे आदरणीय आप्पासाहेबांनी निरूपणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक सकारात्मकता दिली आहे, ती कौतुकास्पद आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनचा बाजार दबावात; कापूस, सोयाबीन, गहू, आले यांचे दर काय आहेत?

Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा दणका

APMC Market : व्यापाऱ्यांचा माल ओट्यांवर, तर शेतकऱ्यांचा रस्त्यावर

Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणात इतका पाणीसाठी शिल्लक, सांगलीकरांना पाणी मिळणार?

Maharashtra Rain : राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यात उन्हाचा चटकाही कायम; पावसाचा जोर वाढणार

SCROLL FOR NEXT