Climate Impact: हवामान बदलाचा मोठा फटका जगाला बसत आहे. २०२५ वर्षात उष्णतेच्या लाटा, जंगलांना वणवे, दुष्काळ, पूर आणि वादळांमुळे जगभरात १२० अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाले, असे एका अहवालात म्हटले आहे. यात हवामान बदलाच्या वाढत्या आर्थिक खर्चाचे विश्लेषण करण्यात आले आहे..ब्रिटनमधील स्वयंसेवी संस्था ‘ख्रिश्चन एड’ने समोर आणलेल्या या अहवालात जीवाश्म इंधन कंपन्या या संकटाला कारणीभूत ठरत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हवामान बदलाच्या समस्येवर उपाययोजना न केल्याची किंमत चुकवावी लागली आहे. कारण हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली असती तर हे संकटे टाळता आली असती. परिणामी, अशा संकटाचा फटका समुदायांना आजही सहन करावा लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे..Climate Change Impacts: जंगलांना वणवे, दुष्काळ, पूर, वादळांमुळे २०२५ मध्ये जगाचे १२० अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान .‘'या आपत्ती नैसर्गिक स्वरूपाच्या नाहीत, तर त्या जीवाश्म इंधनाची वाढती व्याप्ती आणि राजकीय विलंबाचे अंदाजित परिणाम आहेत,’’ असे लंडनच्या इंपिरियल कॉलेजमधील एमेरिटस प्रा. जोआना हेग सांगतात..आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक फटका बसलेल्या दहा घटनांपैकी प्रत्येकामुळे १ अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक नुकसान झाले. तर एकूण नुकसानीचा आकडा १२२ अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक आहे. यातील बहुतांश अंदाज हा विमा कंपन्यांकडून मिळालेल्या नुकसानीवर आधारित बांधण्यात आले आहे, याचाच अर्थ प्रत्यक्षात नुकसान अधिक असण्याची शक्यता आहे. तर मानवी नुकसानीची अनेकदा मोजदादच केली जात नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे..या अहवालात दहा प्रतिकूल हवामानाच्या घटनांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यांचा विमा नुकसानीच्या दृष्टीने पहिल्या दहामध्ये समावेश नव्हता. तरीही त्या मोठ्या प्रमाणात विनाशकारी होत्या आणि त्यांचा लाखो लोकांवर परिणाम झाला..Climate Change Impact : हवामान बदलाच्या समस्येसाठी कार्बन कर हाच उपाय.नोव्हेंबरमध्ये आग्नेय आशियात धडकलेली चक्रीवादळे आणि पुरांच्या घटना या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ज्यामुळे थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका, व्हिएतनाम आणि मलेशिया आदी देशांमध्ये २५ अब्ज डॉलर्स एवढे नुकसान झाले. तर या घटनांमध्ये १,७५० हून अधिक लोकांचा बळी गेला..‘‘तिसरी मोठी घटना म्हणजे चीनमधील विनाशकारी पूर. यामुळे हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले. यात ११.७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. तर किमान ३० जणांचा मृत्यू झाला. २०२५ वर्षात कोणताही खंड हवामानाशी संबंधित गंभीर स्वरूपाच्या आपत्तींतून सुटला नाही. कारण या अहवालात जगातील सहा सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या प्रदेशांत प्रत्येक ठिकाणी किमान एक आपत्तीची घटना घडलेली आहे.’’.‘‘ब्राझीलमधील दुष्काळाची परिस्थिती, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये वणव्यांच्या घटना आणि ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेतील रियुनियन बेटावर फेब्रुवारीमध्ये चक्रीवादळे धडकली. हे पाहता जगाचा कोणताही कोपरा आपत्तींपासून वाचला नाही,’’ असे अहवालात म्हटले आहे..कॅलिफोर्नियातील आग, सर्वात भयंकर घटना‘‘यातील काही घटना ह्या गरीब देशांमध्ये घडल्या, जिथे अनेक लोकांना विम्याचे संरक्षण नाही. आकडेवारी कमी उपलब्ध आहे. २०२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक नुकसानीच्या बाबतीत, अमेरिकेला मोठी झळ बसली. त्यात कॅलिफोर्नियातील आगीचा समावेश आहे. येथील वणव्याने शेकडो एकर जंगल नष्ट झाले. ही अमेरिकेतील सर्वात भयंकर आगीची घटना असून, यात ६० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. या आगीत ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला,’’ असे अहवालात नमूद केले आहे..भारत, पाकिस्तानमध्ये पुरामुळे १,८६० हून अधिक लोकांचा मृत्यूआशियातील सहा सर्वाधिक आर्थिक फटका बसलेल्या आपत्तींपैकी चार आपत्ती आशियामध्ये घडल्या. भारत आणि पाकिस्तानमधील पुरामुळे १,८६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामुळे ६ अब्ज डॉलर्सपर्यंत नुकसान झाले. तर एकट्या पाकिस्तानमध्ये पूरपरिस्थितीमुळे ७० लाखांहून अधिक लोक प्रभावित झाल्याचे दिसून आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.