Water Project Agrowon
ताज्या बातम्या

Water Project : इच्छागव्हाण धरणाचे काम लवकर करा

दरम्यान या धरणामुळे उमरकुवा, सोरापाडा, पिंपरपाडा, इच्छागव्हाण परिसरातील जवळपास ३३० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आजच्या दौऱ्यामुळे धरणाच्या कामात गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टीम ॲग्रोवन

तळोदा, जि. नंदुरबार : तब्बल २३ वर्षांपासून रखडलेल्या इच्छागव्हाण (ता. तळोदा) येथील धरणाच्या (Ichhagavhan Dam) ठिकाणी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी गुरुवारी (ता. २२) भेट देऊन कामाची पाहणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या धरणाचे काम (Dam Work) लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान या धरणामुळे उमरकुवा, सोरापाडा, पिंपरपाडा, इच्छागव्हाण परिसरातील जवळपास ३३० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आजच्या दौऱ्यामुळे धरणाच्या कामात गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हाधिकारी खत्री यांनी तळोदा तालुक्यातील आमलाड, इच्छागव्हाण, झिरी-पाठडी व श्रीकृष्ण खांडसरी या ठिकाणी भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. या वेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी मंदार पत्की, तहसीलदार गिरीश वखारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी, अभियंता सुमास गावित आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी खत्री यांनी आमलाड येथील एका स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन दुकानातील दप्तर व धान्याची तपासणी केली. यादरम्यान त्यांना दुकानात जास्तीचे धान्य आढळून आले, त्यामुळे त्यांनी संबंधित दुकानदाराला या बाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीला भेट देत रोजगार हमी योजनांचा अंतर्गत होत असलेल्या कामाची पाहणी केली.

बांबू प्रक्रिया उद्योगाला भेट

जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी माजी मंत्री पद्माकर वळवी व योगिता वळवी यांच्या झिरी-पाठडी (ता. तळोदा) येथील बांबू प्रक्रिया उद्योगाला भेट देऊन बांबूपासून तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंची पाहणी केली. यातून ग्रामीण भागातील नागरिकांना कशाप्रकारे रोजगार उपलब्ध होत आहे, याबाबत पद्माकर वळवी यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सीमा वळवी, संजय गांधी निराधार समितीच्या निशा वळवी उपस्थित होत्या.

मजुरांना धान्य द्या...

या वेळी जिल्हाधिकारी खत्री भेटी देऊन परतत असताना त्यांना श्रीकृष्ण खांडसरी जवळ मजुरांचा पडाव दिसला, त्यांनी लागलीच त्या ठिकाणी भेट देत खांडसरीत काम करणाऱ्या मजुरांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. मजूर कन्नड तालुक्यातील असल्याचे त्यांना कळल्यावर त्यांनी ज्या मजुरांनी त्यांच्या गावात धान्य घेतले नसेल, अशा मजुरांना त्वरित धान्य देण्याचा सूचना त्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना केल्या. तसेच, ज्या मजुरांचे लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करण्याची सूचना देखील त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT