Ashadhi Wari Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2023 : संतबंधूंच्या विसाव्याला लाखों वैष्णवांचा जमला मेळा

Palkhi Sohala 2023 : या निमित्ताने लाखों वैष्णवांचा मेळा फुलून गेला. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाने परिसर भक्तिरसात भारून गेला.

Team Agrowon

Solapur News : वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला ।

विठ्ठलनामकाला पंढरीसी ॥ १ ॥

हरिनामा विनट हरी उच्चारीत ।

सप्रेम डुल्लत भक्तजन ॥ २ ॥

या उक्तीप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, संत चांगावटेश्वर महाराज यांचे पालखी सोहळे सोमवारी (ता. २६) दुपारच्या विसाव्याच्या निमित्ताने तोंडले-बोंडले (ता.माळशिरस) येथे एकत्र आले. या निमित्ताने लाखों वैष्णवांचा मेळा फुलून गेला. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाने परिसर भक्तिरसात भारून गेला.

आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची आस धरून निघालेले श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे वेळापूर व बोरगाव येथील मुक्काम आटोपून दुपारच्या विसाव्यासाठी तोंडले-बोंडलेत दाखल झाले.

तर श्री संत सोपानदेव महाराज व श्री संत चांगावटेश्वर महाराज यांचे पालखी सोहळे कालच रात्रीच्या मुक्कामासाठी बोंडले येथे विसावले होते. प्रमुख पालख्यांचे पालखी सोहळे येथे एकत्र आल्याने लाखों वैष्णवांचा मेळा याठिकाणी जमला होता.

आजूबाजूने एक-एक सोहळे गावात दाखल होत असताना, हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. फटाक्यांची आतषबाजी, संतांच्या पादुकांना नंदाच्या ओढ्यावर स्नान घालून गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्यांचे स्वागत करण्यात आले.

दुपारचे जेवण व विसाव्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपानदेव महाराज भंडीशेगाव तर श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पिराची कुरोली येथे पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

दुपारचे जेवण व विसाव्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपानदेव महाराज भंडीशेगाव तर श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पिराची कुरोली येथे पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Livestock Care: थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Farmer Demand: शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत करा; संभाजी ब्रिगेड

Crop Loss Inspection: अतिवृष्टी, महापुराची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Farmers Protest: सातबारा कोरा करण्याची घोषणा फसवी

KGS Sugar Mill: केजीएस साखर कारखान्याचे धुराडे पेटणार

SCROLL FOR NEXT