Ashadhi Wari 2023 : कामातच विठ्ठल पाहणाऱ्या वारकऱ्यांची कृषी जागर दिंडी

Palkhi Sohala : ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’ या संत सावता माळी महाराज यांच्या अभंगातील आशयाप्रमाणे कामातच आपला देव मानणाऱ्या लोकांनी आषाढी यात्रेनिमित्त कृषी जागर दिंडीची परंपरा सुरू केली आहे.
Ashadhi Wari
Ashadhi WariAgrowon

Solapur News : ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’ या संत सावता माळी महाराज यांच्या अभंगातील आशयाप्रमाणे कामातच आपला देव मानणाऱ्या लोकांनी आषाढी यात्रेनिमित्त कृषी जागर दिंडीची परंपरा सुरू केली आहे.

यावर्षी प्रथमच सुरू झालेल्या या दिंडीतील कृषी वारकऱ्यांनी मंगळवेढा ते पंढरपूर दरम्यान शेतकऱ्यांना शेतीच्या सुधारित तंत्राची माहिती दिली. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या कृषी जागर दिंडीचे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्साहात स्वागत केले.

शेतीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या दिंडीचे सिद्धेवाडी, एकलासपूर, अनवली, गोपाळपूर व पंढरपूर येथे जंगी स्वागत झाले. पांडुरंगाच्या मूर्तीची जीपमध्ये छान आरास केली आहे. वारी परिवार, मंगळवेढा व ॲग्रिकल्चर मार्केटिंग वेल्फेअर असोसिएशन, सोलापूर यांच्या वतीने या दिंडीचे आयोजन करण्यात आले.

Ashadhi Wari
Ashadhi wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत

प्रारंभी संत चोखामेळा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या दिंडीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झाले. यातील वारकऱ्यांनी वाटेत अनेक ठिकाणी रिमझिम पाऊसधारा अंगावर झेलत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Ashadhi Wari
Agriculture Irrigation : उसासाठी माजलगाव धरणातून दोन दिवस मिळणार पाणी

शेतीमालाचे पडलेले दर, पीक फेरपालट, पशुधन व दुग्ध व्यवसायातील अडचणी, पाणी व खत नियोजन, कीड व रोग नियंत्रण याबरोबरच यांत्रिकीकरणाबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. अडचणीच्या काळात शेती सांभाळून आपला प्रपंच कसा सांभाळायचा याबद्दल विशेष जागृती करण्यात आली.

पंढरपूरातील जिजामाता उद्यानातील वाचनालयामध्ये या दिंडीचा समारोप प्रमाणपत्राचे अनावरण करून करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश पवार, सचिव अजय अदाटे, ज्ञानेश्वर चोरमले, सचिन पवार, चंद्रकांत जाधवर, वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तु, विनायक कलुबर्मे, अरुण गुंगे आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com