Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : पुणे जिल्ह्यात १९ हजार ऊस उत्पादकांना पीककर्जाचे वाटप

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील १९ हजार ९० सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २२१ कोटी १९ लाख ५८ हजार रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले आहे.

Team Agrowon

Pune News पुणे ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (PDCC Bank) जिल्ह्यातील १९ हजार ९० सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Farmer) २२१ कोटी १९ लाख ५८ हजार रुपयांचे पीककर्जाचे (Crop Loan) वाटप केले आहे. यंदा १८ हजार १७१ हेक्टरसाठी ऊस उत्पादकांना पीककर्ज दिले असल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

पुणे जिल्हा बँकेच्या वतीने मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित करण्यात येत आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांपासून केंद्र सरकारने व्याज परताव्यावरील सवलतीत अर्ध्या टक्क्याने कपात केली आहे.

त्यामुळे शून्य टक्के व्याजाची ही योजना अडचणीत आली होती. परंतु राज्य सरकारच्या सूचनेनुसार या अर्ध्या टक्क्याचा फरकाचा भार उचलण्याची तयारी राज्य सहकारी बँकेने दर्शविली आहे.

त्यामुळे खरिपात कमी प्रमाणात पीककर्जाचे वाटप करण्यात आले होते. परंतु रब्बी हंगामात पीककर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे.

जिल्ह्यातील खरीप, रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बँकेने एकूण दोन हजार ३८४ कोटी ३७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी सर्वाधिक पीककर्जाचे हे ऊस उत्पादकांना करण्यात आले आहे. बँकेच्या सुमारे २५० हून अधिक शाखांमार्फत सभासद शेतकऱ्यांना रकमचे वाटप केले होते.

विविध पिकांना दिले जाते कर्ज

रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भूईमूग अशा अनेक पिकांना पीककर्जाचे वाटप करत आहे. त्यामुळे दरवर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. बँकेकडून रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात.

परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामाचे नियोजन करून पिके घेतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT