Bhandardara Dam Agrowon
ताज्या बातम्या

Nagar Rain Update : भंडारदऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

Bhandardara Dam Water : भंडारदरा धरणात पाण्याची होणारी आवक पाहता ८३ टक्क्यांवर पाणीसाठा ठेवून सोमवारी (ता. २४) सकाळी भंडारदरा धरणातून ३ हजार १९७ क्युसेकने पाण्याचा प्रवरा नदीत विसर्ग सुरू केला आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात पाऊस नसला तरी अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील रतनवाडी, घाटघर परिसरांत जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारदरा धरणात पाण्याची होणारी आवक पाहता ८३ टक्क्यांवर पाणीसाठा ठेवून सोमवारी (ता. २४) सकाळी भंडारदरा धरणातून ३ हजार १९७ क्युसेकने पाण्याचा प्रवरा नदीत विसर्ग सुरू केला आहे. दुपारी बारा वाजता हा विसर्ग ४ हजार २९७ क्युसेकने करण्यात आला. यामुळे आता निळवंडे धरणही लवकर भरणार आहे.

नगर जिल्ह्यात अजूनही बहुतांश भागात जोरदार पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात, भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणांसह नगरला पाणी देणाऱ्या पुणे जिल्ह्यातील धरणात पाणी साठवण होत असल्याने लाभक्षेत्रात काहीसे समाधान आहे.

अकोले तालुक्यातील रतनवाडी, घाटघर, हरिश्‍चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. प्रशासनाकडील नोंदीनुसार सोमवारी (ता. २४) सकाळी सहा वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत घाटघरला १४६ मिलीमीटर, रतनवाडीला १४१ मिलीमीटर, पांजरे येथे १०४ मिलीमीटर, वाकीला ५७ मिलीमीटर भंडारदरा धरण परिसरात ७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

भंडारदरा धरणात होत असलेल्या पाण्याच्या आवकेचा विचार करता धरणात सव्वानऊ टीएमसी (८३ टक्के) पाणीसाठा झाल्यावर धरणातून सकाळी दहा वाजता ३ हजार १९७ क्युसेकने पाण्याचा प्रवरा नदीत विसर्ग सुरू केला आहे. दुपारी बारा वाजता हा विसर्ग ४ हजार २९७ क्युसेकने करण्यात आला.

हे पाणी प्रवरेतून निळवंडे धरणात येणार आहे. ८.३ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात सध्या ४०.३८ टक्के पाणीसाठा असला तरी आता भंडारदरातून विसर्ग सुरू केल्याने ते पाणी निळवंडेत येणार आहे. त्यामुळे निळवंडे धरणही लवकर भरणार आहे.

पाणलोटातील पावसामुळे मुळा धरणातही सोमवारी (ता. २४) सकाळी कोतुळजवळ ६ हजार ५९२ क्युसेकने आवक सुरू होती. मुळात आतापर्यंत ५०.४३ टक्के म्हणजे १३ टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT