Nagar Rain : नगर जिल्ह्यात सर्वदूर भीज पाऊस

Latest Rain Update : जामखेड तालुक्यातील महसूल मंडलात चांगला पाऊस झाला. मात्र अकोले तालुक्याच्या पश्चिम भाग वगळता अजूनही चांगला पाऊस नसल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
Nagar Rain
Nagar RainAgrowon

Nagar News : जिल्ह्यात मंगळवार (ता. १८) पासून भीज पाऊस सुरू होता. बुधवारी (ता. १९) सकाळी अधूनमधून पाऊस सुरू होता. जामखेड तालुक्यातील महसूल मंडलात चांगला पाऊस झाला. मात्र अकोले तालुक्याच्या पश्चिम भाग वगळता अजूनही चांगला पाऊस नसल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

नगर जिल्ह्यात मंगळवार (ता. १८) रात्रीपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात भीज पाऊस झाला. त्यामुळे वाढीस असलेल्या तूर, कापूस, बाजरी, मका, सोयाबीन पिकांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे.

Nagar Rain
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस

मात्र अजूनही जोरदार पाऊस नाही. जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार बुधवार (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार सर्व ९७ महसूल मंडलांत पाऊस झाला. काही मंडलांत चांगला पाऊस झाला. जोरदार नसला तरी भीज पावसाने रखडलेल्या पेरण्या होण्याला काहीशी मदत होणार आहे.

Nagar Rain
Konkan Rain Update : कोकण, पूर्वविदर्भात पावसाचा धुमाकूळ

अकोले तालुक्यातील पश्चिम भागात नेहमीपेक्षा कमी असला तरी तेथे सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा, निळवंडेसह मुळात पाणीसाठा वाढत आहे. मुळात आज ३ हजार ६१९ क्युसेकने कोतुळजवळ पाणी आवक सुरू होती.

बुधवर (ता. १९) सकाळपर्यंत झालेला पाऊस असा मिलिमीटर ः रुईछत्तीशी ३२, वाढेगव्हाण २३, मांडवगण ः ३६, बेलवंडी ः २४, पेंडगाव ः २१ चिंभळा ः २३, देवदैठण २८, कर्जत ४३, मिरजगाव ः ४६, माहीजळगाव ः ६१, जामखेड ः ५१, अरणगाव ः ५४, खर्डा ः ४१, नान्नज ः ६०, नायगाव ः ५८, घाटघर ः ६८, रतनवाडी ः ७९, वाकी ः ४७, भंडारदरा ः ५७.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com