Discharge of 66524 cusecs from Jayakwadi begins Agrowon
ताज्या बातम्या

Jayakwadi Dam : जायकवाडीतून ६६५२४ क्युसेकने विसर्ग सुरू

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात मंगळवारी (ता. २०) दुपारी दोन वाजेपर्यंत ७४१८६ क्यूसेकने आवक तर ६६५२४ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

Team Agrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील (Marathwada) सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात (Jaykwadi Dam) मंगळवारी (ता. २०) दुपारी दोन वाजेपर्यंत ७४१८६ क्यूसेकने आवक तर ६६५२४ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग (Water Discharge) सुरू होता.

पाण्याची होत असलेली आवक पाहता सोमवारी (ता. १९) सकाळी ६ वाजताच्या सुमारास ८०१७२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १६) सकाळी ६ वाजता जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा ९९.१२ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यावेळी प्रकल्पात ७५.९८ टीएमसी जिवंत पाणीसाठा तर १०२.५ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला होता.

शुक्रवारी सहा वाजता होणाऱ्या आवकेच्या प्रमाणात १८ दरवाजे दीड फुटाने उघडून २८ हजार ७९६ पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी बारा वाजताच्या सुमारास प्रकल्पाचे उघडलेले १८ गेट साडेतीन फुटाने उघडून विसर्गात मोठी वाढ करत तो ७५ हजार ४५६ क्यूसेक करण्यात आला होता. १८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंत १ लाख १३ हजार ६८४ क्युसेकने २७ दरवाजे ४ फूट उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात होता. सकाळी आठ वाजता विसर्ग कमी करून १ लाख ८ हजार ४६८ क्युसेक पर्यंत आणण्यात आला. हळूहळू तो कमी करत ८०,१७२ क्युसेक करण्यात आला.

सोमवारी (ता १९ )सकाळी ६ वाजता प्रकल्पात ८६,४४७ क्युसेकने आवक सुरू होती. तर ८०१७२ क्युसेकने विसर्ग नदीपात्रात केला जात होता. मंगळवारी सकाळी ६ वाजता २७ दरवाजातून ८०६७२ क्यूसेकनेच विसर्ग सुरू होता. १ जूनपासून १९ सप्टेंबरपर्यंत जायकवाडी प्रकल्पात १७४.४८ टीएमसी पाण्याची आवक झाली असून १२२.४६ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. आवकच्या प्रमाणात जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग कमी अधिक केला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे सूचना जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT