Pune APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC : सकाळी दहाला बाजार बंद करण्यावरून मतभिन्नता

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे-भाजीपाला विभागातील व्यवहार सकाळी दहा वाजता बंद करण्याच्या परिपत्रकावर मतभिन्नता निर्माण झाली आहे. संचालकांच्या मते सकाळी लवकर खरेदी-विक्री व्यवहार उरकले जातील तसेच खरेदीदारांना उपनगरांमध्ये शेतीमाल लवकर घेऊन गेल्यास त्यांना चांगले दर मिळतील.

तर, अडत्यांच्या मते परराज्यातील फळे भाजीपाल्यांची वाहने बाजार आवारात दाखल होऊन त्यांची विक्री होण्यासाठी १२ वाजता त्यामुळे लवकर बाजार बंद केल्यास शेतीमाल शिल्लक राहणार आहे.

पुणे बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती आणि सचिवांनी बाजार आवारातील फळेभाजीपाल्यांचा व्यवहार १० वाजता बंद करण्याचे अजब परिपत्रक काढले आहे. यावर अनेक अडत्यांनी या परिपत्रकाला विरोध दर्शविला आहे.

बाजार समितीमध्ये विविध राज्यांतून शेतीमालाची आवक होत असते. ही आवक होऊन, शेतमाल खाली उतरवून विक्री करण्यासाठी दुपारचे १२ होतात. दहा वाजताच बाजार बंद केल्यास शेतीमाल शिल्लक राहणार असून, त्यामुळे शेतीमालाचे नुकसान होणार आहे.

याबाबत बोलताना अडते असोसिएशनचे अध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक बापू भोसले म्हणाले, ‘‘फळे-भाजीपाला नियमनमुक्तीमुळे बाजार आवाराबाहेर आणि उपनगरांमध्ये परस्पर शेतमालाची विक्री व्हायला लागली आहे. तसेच अनेक खरेदीदार उपबाजारांमध्ये खरेदीसाठी जात आहे.

याचा परिणम बाजार आवारातील व्यवहारांवर झाला आहे. बाजार आवारातील व्यवहार पहाटे तीन वाजता सुरू होतात. पहाटे येणारे खरेदीदार सकाळी लवकर महाग शेतमाल खरेदी करतात.

तोच शेतमाल सकाळी १० वाजता निम्म्या किमतीला मिळतो. यामध्ये खरेदीदारांचे नुकसान होते. यामध्ये उपनगरांमध्ये किरकोळ विक्रेत्यांमध्ये स्पर्धा होते. यामुळे बाजार आवाराला शिस्त लावण्यासाठी ११ वाजेपर्यंतच खरेदी-विक्रीला परवानगी देण्याची शिस्त लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’=

तर, आडत्यांच्या मते, बाजार आवारात १८ ते २० तासांचा प्रवास करून परराज्यांतील फळेभाजीपाल्यांची आवक होत असते. हा शेतमाल उतरवून विक्री करण्यासाठी दुपारचे १२ होतात. परंतु १० वाजताच जर बाजार बंद केल्यावर शिल्लक राहिलेला नाशवंत शेतीमाल सडण्याचा धोका आहे. त्यामुळे जास्त वेळ विक्रीसाठी ठेवला तर त्याची विक्री होऊन, बाजार आवारातील उलाढालदेखील वाढणार आहे.’’

परिपत्रकामध्ये काही त्रुटी आहेत. अडते असोसिएशनच्या माध्यमातून संचालक मंडळाशी बोलून त्यातील काही त्रुटी निश्चित बदल करण्यात येईल.
- विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, अडते असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT