Pune APMC : पुणे बाजार समितीमध्ये बदल्यांचा हंगाम सुरू

Pune APMC Update : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील २० वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर, नवनियुक्त संचालक मंडळाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केल्याने बाजार समिती प्रशासनात मोठी उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे.
Pune APMC
Pune APMC Agrowon
Published on
Updated on

Pune APMC News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील २० वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर, नवनियुक्त संचालक मंडळाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केल्याने बाजार समिती प्रशासनात मोठी उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे.

यामुळे बदल्यांचा हंगाम जोरात सुरू असून, संचालक मंडळाने विविध महत्त्वाच्या जागांवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना ‘साइड पोस्टिंग,’ तर मर्जीतील अधिकाऱ्यांना ‘क्रिम पोस्टिंग’वर वर्णी लावण्यात आली आहे.

बाजार समितीमध्ये फळे-भाजीपाला विभागांसह भुसार विभाग ही प्रमुख पदे महत्त्वाची मानली जातात. या पदांवर काही अधिकाऱ्यांनी प्रशासकीय राजवटीमध्ये राजकीय वजन वापरून, दबाव टाकून कनिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध पदांवर वर्णी लावून घेतली होती. अनेक वर्षे हे अधिकारी या पदांवर ठाण मांडून बसले होते.

Pune APMC
Pune APMC Latest News : पुणे बाजार समितीच्या सभापतिपदी दिलीप काळभोर

मात्र आता नवनियुक्त संचालक मंडळाने बदल्या सुरू केल्या आहेत. यामुळे अनेकांना या बदल्या अडचणीच्या ठरल्या आहेत. काही अधिकारी आपल्या मर्जीतील संचालक निवडून येतील आणि आपल्याला अभय मिळेल या अविर्भावात होते.

मात्र ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतील संचालकांचा पराभव झाल्याने हे अधिकारी नाराज झाले होते. यामुळे त्यांना आता बदलीला सामोरे जात दुय्यम ठिकाणी रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

Pune APMC
Pune APMC News : पुणे बाजार समितीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले

मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी एकाच विभागाचे विभाजन

फळे-भाजीपाला हा एकच विभाग अस्तित्वात होता. मात्र काही प्रशासकांनी आपल्या मर्जीतील कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी या विभागाचे विभाजन करून फळे आणि भाजीपाला असे विभाजन करून, दोन विभागप्रमुखांची नियुक्ती केली होती.

आता हा विभाग पुन्हा एकत्र करून फळेभाजीपाला, कांदा, बटाटा, अन्नभेसळ, माती-पाणी परीक्षण हे विभाग एकत्र करून, वामन तुपे यांची विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

याच विभागाचे विभाजन करून नियुक्त केलेले बाबा बिबवे (तरकारी विभाग) यांची बदली गूळ भुसार सुरक्षा आणि अतिक्रमण विभागप्रमुख पदी, तर कांदा बटाटा व फळ विभागप्रमुख दत्तात्रेय कळमकर यांची टपाल विभाग प्रमुखपदी बदली केली आहे.

इतर बदल्या पुढीलप्रमाणे - कंसात बदलीचे ठिकाण

- महादेव शेवाळे - विवाद व जनमाहिती अधिकारी - (फक्त जनमाहिती अधिकारी)

- रामदास सावंत - मोशी उपबाजार (विभागप्रमुख, गूळ भुसार)

- प्रसाद लडकत - टपाल विभाग - (विवाद विभाग प्रमुख)

- सोमनाथ बोरकर - विभागप्रमुख सुरक्षा - (अतिक्रमण निर्मुलन - गूळभुसार)

- राजेंद्र कामठे - नियमन व आस्थापना - (नियमन विभागासह, मालमत्ता विभाग अतिरिक्त कार्यभार)

- प्रशांत गोते - विभागप्रमुख - गूळ भुसार (गूळ भुसार सर्वसाधारण कामकाज)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com